आॅनलाईन लोकमतगडचिरोली : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या जिल्हाभरातील सुमारे २३० विद्यार्थ्यांवर अवघड शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन सुकर करण्यात आले आहे.केंद्र शासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम १ एप्रिल २०१३ पासून सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात सुमारे २४ पथक आहेत. यातील आश्रमशाळांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र चार पथक आहेत. अंगणवाडी व आश्रमशाळांची तासणी करण्यासाठी २० शालेय आरोग्य तपासणी पथक आहेत. गडचिरोली, अहेरी, एटापल्ली, धानोरा, आरमोरी, सिरोंचा, कुरखेडा, चामोर्शी या तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन पथक आहेत. प्रत्येक पथकात एक पुरूष वैद्यकीय अधिकारी, एक महिला वैद्यकीय अधिकारी, औषधी निर्माता व परिचारिका यांचा समावेश आहे. शालेय आरोग्य तपासणी पथकाला स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. पथकातील डॉ. प्रत्यक्ष शाळा, अंगणवाडीला भेट देऊन बालकांची तपासणी करतात. अंगणवाडींची तपासणी वर्षातून दोन वेळा केली जाते. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत जिल्हाभरातील २ हजार ३७८ अंगणवाड्या तपासण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यापैकी २ हजार २१४ अंगणवाड्यांमधील १ लाख ३९१ बालकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यापैकी ८३ हजार २२१ बालकांची तपासणी झाली. ठरविलेल्या उद्दिष्टाच्या तपासणी झालेल्या बालकांचे प्रमाण ८३ टक्के एवढे आहे. त्यापैकी १६ हजार ८०५ बालक साधारण आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत २ हजार ३८९ अंगणवाड्या तपासणीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५४६ अंगणवाड्यांमधील २३ हजार ६० विद्यार्थ्यांची तपासणी झाली. त्यापैकी ५ हजार ७५० बालकांवर उपचार झाले. आश्रमशाळा तपासणीसाठी स्वतंत्र चार पथक नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १२५ आमश्रशाळांमध्ये ३२ हजार ९१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चालू कालावधीत १२ हजार ५४० विद्यार्थ्यांची तपासणी झाली असून यापैकी ३ हजार ९३५ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले.या रोगांच्या बालकांवर झाल्या शस्त्रक्रियाएप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २८ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याचबरोबर ४४ अस्थीव्यंग, ८ हायड्रोसील, १ किडनीग्रस्त, ३४ हर्निया, ३ अपेंडिक्स, ५ दुभंगलेले ओट, ४५ तिरळेपणा व मोतीबिंदू असलेली बालके, ३५ नाक-कान-घसाग्रस्त व इतर ५७ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.सिरोंचा व भामरागडातील पथकात डॉक्टरच नाहीसिरोंचा येथे दोन आरोग्य पथक व भामरागड येथे एक आरोग्य पथक आहे. मात्र यातील एकाही आरोग्य पथकात डॉक्टर नाही. त्यामुळे या तालुक्यांमधील बालकांची तपासणी ठप्प पडली आहे. याच बरोबर जिल्हाभरातील २४ पथकांमधील १६ डॉक्टरची पदे, एक औषध निर्माता व एक परिचारिकेचे पद रिक्त आहे.२५ हजार विद्यार्थ्यांवर उपचारएप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत एकूण १ हजार ९६८ शाळांमधील १ लाख ८७ हजार २२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ हजार २०८ शाळांमधील ९३ हजार ८७९ विद्यार्थ्यांची तपासणी झाली. २५ हजार ३०४ विद्यार्थी विविध आजारांनी ग्रस्त आढळल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
२३० बालकांना शस्त्रक्रियेमुळे नवजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 11:21 PM
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या जिल्हाभरातील सुमारे २३० विद्यार्थ्यांवर अवघड शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन सुकर करण्यात आले आहे.
ठळक मुद्देराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम : प्रत्यक्ष शाळेत जाऊन बालकांची केली जाते आरोग्य तपासणी