शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

दलित वस्त्यांसाठी मिळणार २.३० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:48 AM

सदर योजनेअंतर्गत १९७४ पासून ज्या गावांना लाभ मिळाला नाही त्या गावांना यात प्राधान्य देऊन त्या गावांची निवड करण्यात आली. यात सर्वाधिक १६ वस्त्या आरमोरी तालुक्यातील आहेत. त्यांना ५८ लाख ४० हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. यासोबतच गडचिरोली तालुक्यातील १४ वस्त्यांचा समावेश असून त्यांना ५३.५० लाखांचा निधी दिला जाणार आहे. प्रत्येक वस्तीला १ ते ५ लाखापर्यंत निधी मिळणार आहे.

ठळक मुद्देआरमोरी तालुक्याला सर्वाधिक निधी : जिल्ह्यातील ७३ गावांमधील वस्त्यांमध्ये होणार कामे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास (दलित वस्ती सुधार) योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील ७३ गावांना २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. ही कामे याच आर्थिक वर्षात पूर्ण करावयाची आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्यात अनेक गावात छोटी-मोठी कामे होणार आहेत.सदर योजनेअंतर्गत १९७४ पासून ज्या गावांना लाभ मिळाला नाही त्या गावांना यात प्राधान्य देऊन त्या गावांची निवड करण्यात आली. यात सर्वाधिक १६ वस्त्या आरमोरी तालुक्यातील आहेत. त्यांना ५८ लाख ४० हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. यासोबतच गडचिरोली तालुक्यातील १४ वस्त्यांचा समावेश असून त्यांना ५३.५० लाखांचा निधी दिला जाणार आहे. प्रत्येक वस्तीला १ ते ५ लाखापर्यंत निधी मिळणार आहे. त्यातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या उत्थानासाठी विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात रस्ता, नाल्या, हातपंप यासारख्या कामांचेच प्रस्ताव येत आहेत. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सदर निधीचे वाटप केले जाणार आहे.निधी मिळण्यासाठी निवडलेल्या गावांमध्ये गडचिरोली तालुक्यातील मारोडा, खुर्सा, मेंढा, पोर्ला (आंबेडकर वार्ड व सुभाष वार्ड), गुरवळा, बामणी, साखरा, खरपुंडी (आंबेडकर वार्ड क्र.३ व गौतम वार्ड क्र.२), पारडी, काटली (गांधी वार्ड, आंबेडकर वार्ड) आणि नगरगाव या गावांमधील वस्त्यांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल, वासाळा (डॉ.आंबेडकर वार्ड व मेश्राम वार्ड), कोरेगाव रांगी (कोरेगाव व थोटेबोडी), नरचुली, मोहझरी, किटाळी, वडधा, कुरंडीमाल (रमाई वार्ड व कराडी चक), देऊळगाव (वार्ड क्र.१ व ३), सिर्सी आणि वैरागड या गावांमधील वस्त्यांना निवडण्यात आले आहे.देसाईगंज तालुक्यातील आमगाव, कुरूड येथील आंबेडकर चौक, होळी चौक व इंदिरा आवास टोली, विसोरा, सावंगी आणि चोप येथील ३ वस्त्यांचा मिळून ३० लाखांचा निधी मिळणार आहे. कोरची तालुक्यातील सोहले, कोठरा व भीमपूर या गावांना १०.५० लाख दिले जाणार आहे. सिरोंचा तालुक्यातील आदिमुत्तापूर, मोयाबीनपेठा, पर्सेवाडा व जामनपल्ली या गावांना १९ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. चामोर्शी तालुक्यात कुनघाडा रै., अड्याळ, ईल्लूर, भाडबिडी बी, माडे आमगाव या गावांना १५ लाखांचा निधी दिला जाणार आहे.भामरागड तालुक्यात आरेवाडा, टेकला, धोडराज, लाहेरी आणि ताडगाव या गावांमधील दलित वस्तींना १२ लाख, मुलचेरा तालुक्यात चुटगुंटा ग्रा.पं.अंतर्गत लगाम चेकसाठी २ लाख, कुरखेडा तालुक्यात तळेगाव व वडेगाव ग्रामपंचायतींना ५.५० लाख, धानोरा तालुक्यात रांगी व मोहली या गावांना ७ लाख मिळणार आहेत.अहेरी तालुक्यात आरेंदा, जिमलगट्टा (रसपल्ली), कमलापूर, कुरूमपल्ली, मेडपल्ली, नागेपल्लीमधील येकापल्ली व मोदुमडगू तथा रेपनपल्ली या गावांच्या दलित वस्तींना १६ लाखांचा निधी दिला जाणार आहे. तसेच एटापल्ली तालुक्यातील सोहगाव (भापडा), घोटसूर (गुंडाम), वटेगट्टा आणि बुर्गी (पैमा) या चार गावांना ८ लाखांचा निधी मिळणार आहे.तपासणी करून गावांची निवडअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास योजनेअंतर्गत १९७४ पासून झालेल्या कामांचा तपासणी करण्यात आली. समाजकल्याण आयुक्त पुणे यांच्यामार्फत नियुक्त चमूने गेल्यावर्षीच ही तपासणी केली. त्यात जिल्ह्यातील कोणत्या दलित वस्त्यांमध्ये किती निधी खर्च करण्यात आला हे पाहिल्यानंतर जी गावे आतापर्यंत वंचित किंवा दुर्लक्षित होती त्याच ग्रामपंचायतींमधील दलित वस्त्यांची यासाठी निवड करण्यात आली. लवकरच त्यातून कामे सुरू होतील.