खासदारांच्या हस्ते उद्घाटन : ६६ जणांवर होणार शस्त्रक्रियाकुरखेडा : श्री भगवान महादेव देवस्थान अरततोंडी ट्रस्टच्या वतीने येथे मोफत मोतीबिंदू व सामान्य शस्त्रक्रिया शिबिरात १३५ नेत्र व ९५ सामान्य अशा एकूण २३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ४२ रुग्णांवर नागपूर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया तर हर्निया, हायड्रोसिल, मुळव्याध असलेल्या २४ रुग्णांवर खासगी रुग्णालयात नागपूर येथे शस्त्रक्रिया येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेला मालार्पण करून करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. क्रिष्णा गजबे होते. यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ. शौनक मोकदम, डॉ. शमिक मोकदम, डॉ. श्वेता मोकदम, नाना नाकाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा सचिव विलास गावंडे, नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, रामहरी उगले आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ते. ना. बुुद्धे यांनी तर संचालन खुशाल फुलबांधे, आभार अॅड. प्रमोद बुद्धे यांनी मानले. शिबिरासाठी भगवान महादेव देवस्थानचे विश्वस्त डॉ. तोमेश्वर लांजेवार, डॉ. पुनाजी भाकरे, डॉ. कागदे, नाना निनावे, नरेश नाकाडे यांच्यासह संत निरंकारी सेवा दलाचे स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)
२३० रुग्णांची तज्ज्ञांकडून तपासणी
By admin | Published: March 17, 2016 1:51 AM