लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात १८ कामांवर केवळ ४१ लाख ९१ हजार रूपये खर्च झाले आहेत. सुमारे २ कोटी ३१ लाखांचा निधी खर्च न झाल्याने परत करावा लागला आहे.गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती केली जाते. धान शेतीला अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत जलसिंचनाची गरज भासते. त्यामुळे शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून बोडी नुतनीकरण, नाला बांधकाम, वळण बंधारा आदी कामे करायची होती. त्यापैकी वर्षभरात १८ कामे हाती घेऊन त्यावर ४१ लाख ९१ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया उशीरा झाल्याने ही कामे होऊ शकली नाही. परिणामी एकूण प्राप्त निधीपैकी २ कोटी ३१ लाख ६७ हजार रूपयांचा निधी शिल्लक राहिला आहे. शिल्लक राहिलेला निधी जिल्हा नियोजन समितीकडे समर्पीत करण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे संरक्षीत जंगल असल्याने मोठा सिंचन प्रकल्प बांधणे आता शक्य सुध्दा नाही. त्यामुळे लहान प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. मात्र निधीअभावी सिंचनाची कामे रखडली असल्याचे दिसून येते. मात्र दुसरीकडे गतिमान पाणलोट विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे २ कोटी ७३ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला असताना त्यापैकी सुमारे २ कोटी ३१ लाख रूपयांचा निधी खर्च झाला नाही. परिणामी सदर निधी समर्पीत करावा लागला. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक कामेपाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली तालुक्यासाठी १९.५२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. वर्षाअखेर सर्वच निधी खर्च झाला आहे. धानोरा तालुक्यासाठी १९.९२ लाख रूपये मंजूर होते. त्यापैकी १७ लाख ४९ हजार रूपये खर्च झाले आहेत. आरमोरी तालुक्यात १४.९७ लाखापैकी दोन लाख रूपये, कुरखेडा तालुक्यात १६.९२ लाखांपैकी २ लाख ९० हजार रूपये खर्च झाले आहेत. कोरची तालुक्यासाठी २६ लाख ३४ हजार, अहेरी तालुक्यासाठी ६० लाख ५५ हजार, एटापल्ली ३६ लाख ६४ हजार, भामरागड ५७.६१ लाख, सिरोंचा २१.११ लाख रूपयांचा निधी मंजूर होत. मात्र यापैकी एकही निधी खर्च झाला नाही.
पाणलोट विकासाचे २.३१ कोटी परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:32 PM
सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात १८ कामांवर केवळ ४१ लाख ९१ हजार रूपये खर्च झाले आहेत. सुमारे २ कोटी ३१ लाखांचा निधी खर्च न झाल्याने परत करावा लागला आहे.
ठळक मुद्देकेवळ ४२ लाख रूपये खर्च : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २ कोटी ७३ लाख रूपये झाले होते मंजूर