शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

रोहयोवरील २.३८ लाख मजूर अकार्यक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 10:55 PM

सिंचनाच्या अपुºया सुविधेमुळे शेतीची बारमाही कामे नसताना आणि रोजगाराची इतर साधनेही नसताना गडचिरोली जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर जाण्यास मजूरवर्ग इच्छुक नाही.

ठळक मुद्देवास्तव : नोंदणी करून दोन वर्षात एकदाही कामावर हजर नाही

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सिंचनाच्या अपुºया सुविधेमुळे शेतीची बारमाही कामे नसताना आणि रोजगाराची इतर साधनेही नसताना गडचिरोली जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर जाण्यास मजूरवर्ग इच्छुक नाही. रोजगार हमीच्या कामांसाठी नोंदणी केल्यानंतर गेल्या दोन वर्षात एकाही कामावर न जाणारे जिल्ह्यात तब्बल २ लाख ३८ हजार ७ मजूर आहेत. या सर्व मजुरांना अकार्यक्षम ठरविण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ७२ हजार १३५ कुटुंबांनी महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर जाण्यासाठी नोंदणी केली. त्या कुटुंबांमधील मजूरसंख्या ५ लाख १२ हजार ८३७ आहे. परंतू गेल्या दोन वर्षात त्यापैकी २ लाख ७४ हजार ८३० मजुरांनीच रोहयोच्या कामांवर जाणे पसंत केले. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत ६२ हजार ५७५ कुटुंबांमधील १ लाख २७ हजार ६२६ मजुरांना या योजनेअंतर्गत रोजगार देण्यात आला आहे. त्यापैकी २५१४ कुटुंबांमधील १० हजार ८९६ सदस्यांनी १०० दिवसांचा रोजगार पूर्ण केला आहे.या आर्थिक वर्षात आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ८० कोटी २० लाख रुपये रोजगार हमीच्या कामांवर खर्च करण्यात आले आहेत. प्रशासनाने मोठ्या प्रमाणात विविध यंत्रणांमार्फत कामे मंजूर करून ठेवली असली तरी या कामांवर येण्यास मजूर पाहिजे त्या प्रमाणात उत्सुक दिसत नाही. याऊलट काही मजूर तेलंगणा, आंध्र प्रदेश किंवा छत्तीसगड राज्यात काम करण्यासाठी जात असल्याचे दिसून येत आहे.२२,३२१ मजुरांची नोंदणी रद्दयावर्षी अकार्यक्षम असणाऱ्या ५७०९ कुटुंबांमधील २२ हजार ३२१ सदस्यांची रोहयोच्या कामावर मजूर म्हणून येण्यासाठी केलेली नोंदणी रद्द करण्यात आली आहे.दुसरीकडे ३९२४ कुटुंबांमधील ९ हजार ३७२ सदस्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली आहे. सध्या रोहयोच्या कामासाठी १ लाख ६३ हजार ३०३ कुटुंबांकडे कार्यक्षम मजूर म्हणून जॉब कार्ड आहे.