लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : आदिवासी विकास विभागाच्या वतीने गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर विभागीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये भामरागड प्रकल्पाने सलग ११ व्यांदा चॅम्पियनशिप पटकाविली. भामरागड प्रकल्पाच्या क्रीडा यशात वैयक्तिक खेळात लोकबिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा येथील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली.आदिवासी विकास विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील २५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २४ खेळाडूंनी यश मिळविले. १९ वर्ष वयोगट मुलात नागेश कंगाली ८०० मीटरमध्ये प्रथम, ४०० मीटर द्वितीय, ४ बाय ४०० मीटर रिले प्रथम, ४ बाय १०० मीटर रिले प्रथम, सुनील आलामी ४०० मीटरमध्ये प्रथम, भालाफेक प्रथम, दोन्ही रिले प्रथम, विनोद कुडयामी १५०० मीटरमध्ये प्रथम, दोन्ही रिले प्रथम, नरेश आत्राम ४ बाय १०० रिले प्रथम, राकेश पुंगाटी ४ बाय ४०० रिले प्रथम, १७ वर्ष वयोगट मुलात शिवेंद्र कुडयामी भालाफेक मध्ये प्रथम, १५०० मीटर द्वितीय, ३००० मीटरमध्ये द्वितीय, ४ बाय ४०० रिलेमध्ये द्वितीय, धीरज गोटा १५०० मीटरमध्ये प्रथम, ३००० मीटरमध्ये प्रथम, ४ बाय ४०० रिलेमध्ये द्वितीय, राकेश पिडसे व पंकज आत्राम ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये द्वितीय, १९ वर्ष वयोगट मुलीत सपना वेळदा ८०० मीटरमध्ये प्रथम, ४ बाय १०० रिलेमध्ये प्रथम, ४०० मीटरमध्ये प्रथम, संगीता तेलामी ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये प्रथम, रोषना वड्डे भालाफेक प्रथम, १७ वर्ष वयोगट मुलीत वंदना तिम्मा लांबउडी प्रथम, दोन्ही रिले प्रथम, बाली तिम्मा ८०० मीटरमध्ये प्रथम, दोन्ही रिले प्रथम, मीना उसेंडी भालाफेक प्रथम, सविता परसा गोळा फेक प्रथम, संजना आत्राम १०० मीटरमध्ये द्वितीय, २०० मीटरमध्ये तृतीय, दोन्ही रिले प्रथम, मीना तलांडी गोळा फेक द्वितीय, प्रियांका वाचामी ३००० मीटरमध्ये द्वितीय, १५०० मीटरमध्ये तृतीय, १४ वर्ष वयोगटात सीता मडावी गोळाफेकमध्ये प्रथम अशाप्रकारे २४ विद्यार्थी खेळाडूंनी यश संपादन करीत लोकबिरादरी आश्रम शाळेचा विभागीय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक (रिले) खेळात दबदबा निर्माण केला. सर्व खेळाडूंना शिक्षक विवेक दुबे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे अनिकेत आमटे, समीक्षा आमटे, प्रा. डॉ. विलास तळवेकर, मुख्याध्यापक शरीफ शेख व शिक्षकांनी कौतुक केले आहे.
लोकबिरादरीचे २४ खेळाडू चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:49 AM
आदिवासी विकास विभागाच्या वतीने गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर विभागीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये भामरागड प्रकल्पाने सलग ११ व्यांदा चॅम्पियनशिप पटकाविली.
ठळक मुद्देक्रीडा स्पर्धा : रिले, लांब उडी, उंच उडी, भालाफेकमध्ये कामगिरी