लोकमत न्यूज नेटवर्कघोट : रेगडी येथील कन्नमवार जलाशयात २४.४५ टक्के जलसाठा साचला आहे. तलाव भरण्यासाठी पुन्हा पावसाची आवश्यकता आहे.घोट परिसरातील रेगडी येथील कन्नमवार जलाशय हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे. या तलावाच्या माध्यमातून चामोर्शी, भेंडाळा, घोट परिसरातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे सदर तलाव किती प्रमाणात भरला याबाबत शेतकरी व सामान्य नागरिकांमध्ये उत्कंठा राहते. चामोर्शी तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा या तलावाच्या माध्यमातून मिळते. सदर तलाव दिना नदीवर बांधण्यात आला आहे. त्यामुळे दिना नदी वाहण्यास सुरूवात झाल्यानंतर तलाव लवकरच भरते. मात्र अजूनपर्यंत जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नाही. आजपर्यंत झालेला पाऊस जमिनीमध्येच जिरला. त्यामुळे दिना नदी अजूनही पाहिजे तेवढी वाहण्यास सुरूवात झाली नाही. त्यामुळे तलावाची पातळी सुद्धा वाढू शकली नाही.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने जुलै महिन्यापासून दमदार पावसाला सुरूवात होते. आॅगस्ट महिन्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहते. मात्र यावर्षी आता जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपूनही अजूनपर्यंत दमदार पावसाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे तलाव अजूनही अर्धाही भरला नाही. तलावात १८.७४ टक्के हा जुना जलसाठा होता तर यावर्षीच्या पावसाने ५.७१ टक्के वाढ होऊन तलाव २४.४५ टक्के भरले आहे. तलाव पूर्ण भरण्याची अपेक्षा शेतकरी करीत आहेत.मामा तलाव कोरडे ठाकजुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे मामा तलाव अजूनही कोरडे ठाक आहेत. काही मध्यम तलावांमध्ये मागील वर्षीचे पाणी उपलब्ध होते. तेवढाच जलसाठा यावर्षी सुद्धा शिल्लक आहे. नवीन पाण्याची मात्र भर पडली नाही. मामा तलाव व बोड्यांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी पुरविले जाते. त्यामुळे तलाव व बोड्या भरणे आवश्यक आहे. धानाचे पºहे रोवण्याजोगे झाली आहेत. मात्र पाऊस नसल्याने अजूनपर्यंत धान रोवणीला सुरूवात झाली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशाच शेतकऱ्यांनी धान रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे.
रेगडी तलावात २४ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 5:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क घोट : रेगडी येथील कन्नमवार जलाशयात २४.४५ टक्के जलसाठा साचला आहे. तलाव भरण्यासाठी पुन्हा पावसाची आवश्यकता ...
ठळक मुद्देमोठ्या पावसाची प्रतीक्षा : हजारो हेक्टर क्षेत्राला पुरविते सिंचन सुविधा