लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत आरमोरी शहरात येणारी दारू जप्त करण्यात आली. सदर कारवाई गुरूवारी सकाळी ९ वाजता देसाईगंज मार्गावरील रेशिम कार्यालयाजवळ करण्यात आली. यामध्ये दोन आरोपींना अटक केली. अमिर पठाण, मोशीन शेख दोघेही राहणार गोंदिया असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.आरमोरी शहरात येत्या २७ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांना दारूचा पुरवठा होऊ नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. आरमोरी येथे देसाईगंजवरून चारचाकी वाहनातून दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस शिपाई दिनेश कुथे यांना मिळाली. त्यानुसार रेशिम कार्यालयाजवळ नाकाबंदी केली असता, एमएच-३५-के-३३९६ क्रमांकाच्या वाहनात २ लाख ४० हजार रुपयांची दारू आढळून आली.दारूसह वाहनसुद्धा जप्त करण्यात आले. वाहनाची किंमत दोन लाख रुपये एवढी आहे. सदर दारू झाकण्यासाठी गुपचूपची पाकिटे वापरण्यात आली होती. सोबतच २२ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण ४ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अजीत राठोड, पोलीस शिपाई प्रशांत वºहाड, वसंत वैद्य, दिनेश कुथे आदींनी केली.
२.४० लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:57 PM
आरमोरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत आरमोरी शहरात येणारी दारू जप्त करण्यात आली. सदर कारवाई गुरूवारी सकाळी ९ वाजता देसाईगंज मार्गावरील रेशिम कार्यालयाजवळ करण्यात आली. यामध्ये दोन आरोपींना अटक केली.
ठळक मुद्देआरमोरीत कारवाई : दोन आरोपींना अटक