शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नागपूर प्रवासासाठी २४० रूपये तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:19 AM

दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा आर्थिक लाभ उठविण्यासाठी एसटी महामंडळाने १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे या कालावधीत नागपूरसाठी प्रवाशांना सुमारे २४० रूपये मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देएसटी महागली : दिवाळीनिमित्त १० टक्के हंगामी भाडेवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा आर्थिक लाभ उठविण्यासाठी एसटी महामंडळाने १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे या कालावधीत नागपूरसाठी प्रवाशांना सुमारे २४० रूपये मोजावे लागणार आहेत. नागपूरची नियमित तिकीट २१५ रूपये आहे.दिवाळीसाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या गावाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. लक्ष्मी पूजनानंतर भाऊबिज सुरू होते. भाऊबिजेनिमित्त पुन्हा जवळपास आठ दिवस बसमध्ये गर्दी राहते. या गर्दीच्या हंगामाचा लाभ उचलण्यासाठी मागील काही वर्षांपासून ऐन दिवाळीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेतला जात आहे. मागील वर्षी काही दिवस वगळून भाडेवाढ होती. यावर्षी मात्र सरसकट १ ते १६ नोव्हेंबरपर्यंत १० टक्के भाडेवाढ लागू केली आहे. या भाडेवाढीच्या माध्यमातून जादा उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न एसटी विभागाकडून सुरू आहे. त्याचबरोबर मुख्य मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत.गडचिरोली आगारातून प्रामुख्याने नागपूर, देसाईगंज, चंद्रपूर, सिरोंचा, धानोरा व गडचिरोली जिल्ह्याच्या इतर ग्रामीण भागात बसफेºया जातात. नियमित मार्गांवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन बसफेºया वाढविल्या जाणार आहेत. गडचिरोली आगारातून यवतमाळ, नागपूरसाठी प्रत्येकी दोन फेºया तर अहेरी तालुक्यातील रेगुंठा व अहेरीसाठी प्रत्येकी एक अतिरिक्त फेरी अशा एकूण सहा फेºया वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन वेळेवर बसफेºया सोडल्या जाणार आहेत.एसटीसमोर खासगी बससेवेचे आव्हानगर्दीच्या हंगामाचा फायदा उचलण्यासाठी एसटीने सुमारे १० टक्के भाडेवाढ केली आहे. १०० रूपयांपर्यंतच्या प्रवासाचे तिकीट १० रूपयांनी वाढले आहे. कुटुंबातील चौघे प्रवास करणार असतील तर ४० रूपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. एसटीला खासगी बससेवेसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. एसटीने भाडेवाढ केली असली तरी खासगी बसची तिकीट वाढविली जात नाही. खासगी वाहनचालक गर्दीच्या हंगामात नियमित प्रवाशांपेक्षा अधिकचे प्रवाशी भरून उत्पन्न मिळवितात. भाडेवाढ झाल्यामुळे एसटीचा प्रवाशी खासगी वाहनाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास एसटीने उत्पन्न वाढविण्यासाठी भाडेवाढीचा घेतलेला निर्णय एसटीलाच तोंडघशी पाडण्यास जबाबदार ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.दिवसेंदिवस नागरिकांकडे कार व दुचाकी वाहनांची संख्या वाढत चालली आहे. याचा मोठा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर पडत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळGadchiroliगडचिरोली