शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

२,५०९ शेततळ्यांतून सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:20 AM

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत कृषी विभागाने एकूण ५ हजार ४०७ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर केले. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत २ हजार ५०९ शेततळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यातून आता सिंचन होत आहे.

ठळक मुद्देउद्दिष्टापेक्षा दुप्पट काम : मागेल त्याला शेततळे योजना; ५,४०७ शेततळे मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत कृषी विभागाने एकूण ५ हजार ४०७ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर केले. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत २ हजार ५०९ शेततळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यातून आता सिंचन होत आहे.शेततळ्यांमुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते. त्याचबरोब अडचणीच्या वेळी पिकांना पाणी देणे हे दुहेरी उद्देश साध्य होत असल्यामुळे शासनाने मागेल त्या शेतकºयाला शेततळे देण्याची योजना सन २०१६-१७ मध्ये सुरू केली. या योजनेला गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेच्या सुरुवातीपासून ते १६ एप्रिलपर्यंत सुमारे ७ हजार ७३० शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केला. कृषी विभागाला प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैैकी ७ हजार ६३४ शेतकऱ्यांनी सेवा शुल्क जमा केले. अर्जांच्या छाननीनंतर ७ हजार ९४ अर्ज पात्र ठरले. कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी शेताची पाहणी केल्यानंतर ५ हजार ७४१ शेतकऱ्यांनी सूचविलेल्या जागा शेततळे खोदण्यासाठी योग्य आढळल्या. तर २९७ जागा अयोग्य आढळल्या. २४१ शेतकºयांच्या जागांची तपासणी होणे बाकी आहे.छाननी अर्ज व जागेची पाहणी केल्यानंतर ५ हजार ४०७ शेतकऱ्यांच्या अर्जांना मंजुरी प्रदान केली. त्यापैकी ३ हजार ५२७ शेतकºयांना शेततळे बांधण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. मागील दोन वर्षाच्या कालावधीनंतर ३१ मार्चपर्यंत २ हजार ५०९ शेततळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.राज्यात गडचिरोली जिल्हा आघाडीवरगडचिरोली जिल्ह्याला केवळ १ हजार ४०० शेततळे खोदण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र प्रत्यक्षात २ हजार ५०९ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेततळे पूर्ण करणारा गडचिरोली हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत ३ हजार ५०० शेततळे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्प नाही. धानाला मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. एका पाण्याने पीक मरते. या कालावधीत पिकाला पाणी देता यावे, यासाठी शेततळे खोदले जात आहेत.