इंग्रजी भाषेत लेखन करण्याची अट स्पर्धेसाठी ठेवण्यात आली हाेती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पंजाबच्या गुरू तेजबहादूर खालसा महाविद्यालय दसुआ, होशियारपूर येथील विद्यार्थिनी शावेटा शर्मा व आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील इंग्रजी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सयुंक्तरीत्या पटकाविला. द्वितीय पारितोषिक एलएडी महिला महाविद्यालय नागपूरची यशोदारा गुप्ता हिने पटकाविला. विजेत्यांना अनुक्रमे १ हजार ५०० व १ हजार रुपये किमतीचे ग्रंथसाहित्य, तसेच प्रमाणपत्र देऊन गाैरविले जाणार आहे, तसेच स्पर्धेत सहभागी इतर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे परीक्षण इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. हितेंद्र धोटे, प्रा. वैशाली बोरकर व बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथील प्रा. डॉ. डी.बी. फुलझेले यांनी केले. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनात इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. हितेंद्र धोटे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. निहार बोदेले यांनी सहकार्य केले.