लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार युवावर्गात रुजविण्यासोबतच त्यांच्या समाजकार्य व राष्ट्रकार्याची ओढ निर्माण करण्याच्या उद्देशाने येत्या २७ व २८ जानेवारीला पंधरावे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आदर्श ग्राम पाटोदा (जि.औरंगाबाद)चे शिल्पकार भास्कर पेरे पाटील राहणार असल्याची माहिती संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन गोंडावाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते होणार आहे. दि. २७ ला ‘आम्ही विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम घेऊन गडचिरोली व धानोरा येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधन दिंडी काढली जाईल. या दिंडीत प्रबोधनकार म्हणून संमेलनाध्यक्ष भास्कर पेरे पाटील, मेंढा-लेखा या गावाला सर्वप्रथम वनहक्क मिळवून देणारे देवाजी तोफा, ज्येष्ठ प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर, चंदू पाटील मारकवार, डॉ. सतीश गोगुलवार, माजी संमेलनाध्यक्ष डॉ.कन्ना मडावी, प्रा.संजय नाथे, डॉ.शिवनाथ कुंभारे, संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक, राष्ट्रीय प्रबोधनकार रवी मानव आदी सहभागी होतील.याच दिवशी रात्री इंजिनिअर भाऊ थुटे (वर्धा) यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.दि.२८ ला मेंढा-लेखा येथील कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य गावगणराज्य साहित्य नगरीत संमेलनाचे रितसर उद्घाटन होणार आहे. यानंतर दुपारी १२ ते ४ दरम्यान दोन परिसंवाद, दुपारी ४ ते ५ दरम्यान देवाजी तोफा आणि भास्कर पेरे पाटील यांची प्रकट मुलाखत ज्ञानेश्वर रक्षक आणि रवी मानव घेतील. सायंकाळी मनोरंजनातून प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या पत्रपरिषदेला डॉ.शिवनाथ कुंभारे, पंडीतराव मुडके, सुखदेव वेठे, रवी मानव, छाया मानव आदी गुरूदेवसेवक उपस्थित होते.विशेष पुरस्कारगडचिरोली येथील डॉ. शिवनाथ कुंभारे, अड्याळ टेकडी येथील तेजराम बगमारे व चंद्रपूर जिल्ह्यातील ग्यानीवंत घोडमारे यांना राष्टÑसंत तुकडोजी महाराज सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी यावेळी दिली.भपकेबाजपणाला देणार फाटाहे राष्टÑसंत विचार साहित्य संमेलन भपकेबाजपणाला फाटा देत अगदी नैसर्गिक वातावरणात, खर्चिक बाबींना फाटा देत होणार आहे. संमेलनाचा मंचही गावातील झाडाखालच्या ओट्यावर राहणार आहे. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय होणाऱ्या या संमेलनातील श्रोते खुर्च्या, खाटा अशा कोणत्याही साधनांचा उपयोग करू शकतात. केवळ श्रोत्यांनी विचारांचे ग्रहण करून चिंतन करावे एवढीच आमची अपेक्षा असल्याचे आयोजकांनी सांगितले. या संमेलनाला इतर राज्यातीलही गुरूदेव सेवाश्रमाचे प्रतिनिधी येणार आहेत.
२७ व २८ ला राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:02 AM
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार युवावर्गात रुजविण्यासोबतच त्यांच्या समाजकार्य व राष्ट्रकार्याची ओढ निर्माण करण्याच्या उद्देशाने येत्या २७ व २८ जानेवारीला पंधरावे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आदर्श ग्राम पाटोदा (जि.औरंगाबाद)चे शिल्पकार भास्कर पेरे पाटील राहणार असल्याची माहिती संमेलनाचे प्रवर्तक ...
ठळक मुद्देभास्कर पेरे पाटील अध्यक्ष : शाळा-महाविद्यालयात जाणार प्रबोधन दिंडी