दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाच्या अर्थसहाय्याने गडचिरोली जिल्ह्यातील २३८ आरोग्य उपकेंद्र व ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हेल्थ वेलनेस क्लिनिक सुरू केले जाणार आहे. या क्लिनिकमध्ये बीएएमएस दर्जाच्या डॉक्टरला नियुक्त दिली जाईल. यामध्ये विशेष करून डायबेटीज, उच्चरक्तदाब, कर्करोग या तीन मुख्य आजारांचे निदान व उपचार केले जाणार आहेत.शासनाच्या आरोग्य विभागाने आजपर्यंत संसर्गजन्य रोग नियंत्रणावर विशेष भर दिल्याने संसर्गजन्य रोग नियंत्रणात आले आहेत. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य रोगांचेही प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये विशेष करूने मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोग या तीन रोगांचा समावेश आहे. ५० वर्ष वय ओलांडलेल्या प्रत्येक दोन व्यक्तीमध्ये एका व्यक्तीला डायबेटीज, उच्चरक्तदाब किंवा कर्करोगाने ग्रासले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या तीन आजारांना आटोक्यात आणण्यासाठी केंद्र शासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे.या तिन्ही आजारांना आटोक्यात आणण्यासाठी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर हेल्थ वेलनेस क्लिनिक सुरू केले जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३७६ आरोग्य केंद्र आहेत. त्यापैकी २३८ उपकेंद्रांमध्ये व संपूर्ण ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हेल्थ वेलनेस क्लिनिक सुरू केले जाणार आहे. या ठिकाणी स्वतंत्र बीएएमएस डॉक्टरची नियुक्ती केली जाईल. त्याला सहा महिन्यांचे असंसर्गजन्य आजारांबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाईल. सदर डॉक्टर असंसर्गजन्य आजाराग्रस्तांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणार आहेत.असंसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याने त्यांच्यावर तत्काळ उपचार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.पाच ठिकाणी लवकरच क्लिनिकगडचिरोली तालुक्यातील पोटेगाव, चामोर्शी तालुक्यातील घोट, अहेरी तालुक्यातील महागाव, धानोरा तालुक्यातील पेंढरी व देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे १५ आॅगस्टच्या अगोदर हेल्थ वेलनेस क्लिनिक सुरू होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर निर्धारीत उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सदर क्लिनिक सुरू होईल. या रूग्णालयांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टरला प्रशिक्षण देऊन डायबेटीज, उच्च रक्तदाब व कर्करोग याबाबतचे निदान व उपचार केले जाईल. या तिन्ही आजारांशी संबंधित औषधी सुध्दा उपलब्ध करून दिली जाणार आहे.आजारग्रस्तांचे सर्वेक्षण३० वर्षावरील डायबेटीज, उच्च रक्तदाब व कर्करोगग्रस्तांचे सर्वेक्षण गावातील आशावर्कर करणार आहेत. यावरून आरोग्य विभागास या आजारग्रस्तांची संख्या लक्षात येण्यास मदत होणार आहे. त्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यासही मदत होणार आहे. याबाबत ११ ते १५ जूनदरम्यान आशांना प्रशिक्षण दिले जात आहे.
२८५ गावांत हेल्थ क्लिनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:33 PM
केंद्र शासनाच्या अर्थसहाय्याने गडचिरोली जिल्ह्यातील २३८ आरोग्य उपकेंद्र व ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हेल्थ वेलनेस क्लिनिक सुरू केले जाणार आहे. या क्लिनिकमध्ये बीएएमएस दर्जाच्या डॉक्टरला नियुक्त दिली जाईल. यामध्ये विशेष करून डायबेटीज, उच्चरक्तदाब, कर्करोग या तीन मुख्य आजारांचे निदान व उपचार केले जाणार आहेत.
ठळक मुद्देअसंसर्गजन्य आजारांवर होणार उपचार : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सोय