साेनापूर येथील २९ शेतकऱ्यांनी आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित, सोनापूर, ता. चामोर्शी येथे ३१ मार्चपूर्वी धानाची विक्री केली. शेतकऱ्यांना पावती देण्यात आली. मात्र, धानाचा मोबदला प्रतिक्विंटल १,८६८ रुपयांप्रमाणे अजूनही देण्यात आलेला नाही. व्यवस्थापक यांना विचारणा केली असता, ऑनलाईन नाेंदणी न झाल्यामुळे अडचण असल्याचे सांगण्यात येत आहे. धानाची विक्री करणे शेतकऱ्यांचे काम आहे. संस्थेने ऑनलाईन नोंदणी करायची होती. पण, संस्थेच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसान भोगावे लागत असेल, तर खूप मोठा अन्याय आहे. शेतकऱ्यांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांना निवेदन देताना उपसरपंच शेषराव कोहळे, माजी सरपंच प्रवीण बिश्वास, रवींद्र घोंगडे, विठ्ठल कुनघाडकर उपस्थित होते.
===Photopath===
080621\59020717img-20210608-wa0245.jpg
===Caption===
सोलापूर येथील 29 शेतकऱ्यांना हमी भावाप्रमाणे मोबदला द्या फोटो