४८ टक्के काम : ९९ तेंदू घटकात हंगाम सुरू; २५ हजारांवर नागरिकांना रोजगार उपलब्धगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पाचही वन विभागामार्फत पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील एकूण ९९ तेंदू घटकांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. २६ एप्रिल पासून या तेंदू घटकाच्या जंगल परिसरात तेंदू संकलनाचे काम जोमात सुरू आहे. आतापर्यंत ९९ तेंदू घटकाच्या जंगल परिसरात एकूण २९ हजार ६९७.७३५ प्रमाणित गोणी तेंदू संकलन झाले असून ४८ टक्के तेंदू संकलनाचे काम झाले आहे. मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालय अधिनस्त असलेल्या गडचिरोली, वडसा व आलापल्ली या तीन वन विभागात पेसा क्षेत्राबाहेरील एकूण २६ तेंदू घटकाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून या तेंदू घटकाच्या जंगल परिसरात तेंदू संकलनाचे काम सुरू झाले. या २६ तेंदू घटकातून एकूण ४१ हजार ९३० प्रमाणित गोणी तेंदू संकलन करण्याचे वन विभागाचे उद्दिष्ट आहे. यापैकी या २६ तेंदू घटकात २० हजार १८७.५२६ प्रमाणित गोणी इतके तेंदू संकलन आतापर्यंत झाले आहे. या तेंदू संकलनाची टक्केवारी ४६.१५ आहे.जिल्ह्याच्या पाचही वन विभागाअंतर्गत पेसा क्षेत्रातील एकूण ७३ तेंदू घटकांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. सदर तेंदू घटक वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभांनी घेतले. तर काही तेंदू घटक ग्रामसभांनी कंत्राटदारांना विकले आहे. या ७३ तेंदू घटकातून एकूण ९३ हजार ४१९ प्रमाणित गोणी तेंदू संकलन करण्याचे वन विभागाचे उद्दिष्ट आहे. यापैकी या तेंदू घटकातून आतापर्यंत ९५०९.८२४ प्रमाणित गोणी तेंदू संकलन झाले आहे. या तेंदू संकलनाची टक्केवारी ४८.४४ आहे. तेंदू संकलन हा व्यवसाय विक्रीचा आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होऊनही तेंदूपत्ता मजुरांना वन विभागामार्फत विम्याचा लाभ दिला जात नसल्याने मजुरांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी) जिल्ह्याबाहेरील मजुरांचे जत्थेही दाखलपेसा व नॉन पेसा क्षेत्रातील एकूण ९९ तेंदू घटकाची लिलाव प्रक्रिया पार पडली असली तरी काही अडचणींमुळे ३० ते ३५ टक्के तेंदू घटकाच्या जंगल क्षेत्रात तेंदू संकलनाचे काम १० मे पर्यंत सुरू झाले नाही. मात्र त्यानंतर या तेंदू घटकात तेंदू संकलनाचे काम सुरू झाले. लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातून तेंदू संकलनाच्या कामासाठी गडचिरोली जिल्ह्यात हजारो मजुरांचे जत्थे दाखल झाले आहेत. गडचिरोली, धानोरा व इतर तालुका ठिकाणच्या बसस्थानक परिसरात तेंदू मजुरांचे जत्थे तेंदूफळीच्या ठिकाणाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.
२९ हजार प्रमाणित गोणी तेंदू संकलन
By admin | Published: May 15, 2016 12:55 AM