लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामीण भागासह दुर्गम भागातही नेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध व्हावी, यासाठी बीएसएनएलच्या वतीने ३-जी यंत्रणा असलेले नवीन ९० टॉवर उभारले जाणार आहेत. आजपर्यंत टू-जी असलेले ११६ टॉवर थ्री-जीमध्ये बदलले जातील, अशी माहिती बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक एम. ए. जीवने यांनी दिली.गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मोबाईल कंपन्यांना कमी उत्पन्न मिळत असल्याने खासगी कंपन्या सेवा देण्यास तयार होत नाही. बीएसएनएलने मात्र सामाजिक दायित्वाची जबाबदारी पार पाडत नागरिकांना सेवा देण्याच्या उद्देशाने नफा तोट्याचा विचार न करता ग्रामीण व दुर्गम भागात टॉवर उभारून सेवा देण्यास सुरूवात केली आहे.बीएसएनएलचे यापूर्वी जिल्हाभरात एकूण १४६ मोबाईल टॉवर आहेत. यापैकी केवळ ३० मोबाईल टॉवर थ्री-जी यंत्रणा असलेले होते. उर्वरित ११६ टॉवरवर टू-जी यंत्रणा लावण्यात आली होती. टू-जी यंत्रणा बोलण्यासाठी उपयोगात येते. मात्र इंटरनेटची स्पीड पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. दिवसेंदिवस ग्रामीण भागातील युवक व नागरिक सुध्दा स्मार्ट फोनचा वापर करीत चालला आहे. या युवा वर्गाला सेवा देण्याच्या उद्देशाने बीएसएनएलने संपूर्ण ११६ ही टॉवर थ्री-जीमध्ये बदलविण्याचा निर्णय घेतला असून यातील २८ टॉवरवर थ्री-जी यंत्रणा लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित टॉवरवर पुढील सहा महिन्यात थ्री-जी यंत्रणा बसविली जाईल, अशी माहिती दिली.गडचिरोली जिल्ह्यात नेट कनेक्टिव्हीटी व मोबाईलच्या जाळ्यांचा विस्तार करून विकासात हातभार लावण्याच्या उद्देशाने आणखी नव्याने ९० टॉवर मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला कनिष्ठ दूरसंचार अभियंता किशोर कापगते, हितेंद्र मेश्राम, उपमंडल अधिकारी राजेश आसटकर हजर होते.राज्यात सर्वाधिक उत्पन्न गडचिरोलीतूनजिल्ह्याच्या तुलनेत इतर जिल्हे प्रगत असल्याने त्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीच्या तुलनेत टॉवरची संख्या सुध्दा अधिक आहे. मात्र राज्यात बीएसएनएलला सर्वाधिक उत्पन्न गडचिरोली जिल्ह्यातून उपलब्ध होते. बीएसएनएलकडे तरूण कर्मचारी व अधिकाऱ्यांचे टीम कार्यरत असून सदर टीम एखाद्या टॉवरमध्ये बिघाड निर्माण झाल्यास तक्रार प्राप्त होताच काही तासाच्या आत बिघाड दुरूस्त करते, अशी माहिती जीवने यांनी दिली.या ठिकाणी होणार नवीन ९० मोबाईल टॉवरगडचिरोली तालुक्यातील गोगाव, बामणी, माडेतुकूम सावेला, गुरवडा, मारोडा, मौशीखांब, मुरमाडी, पुलखल, गडचिरोली येथील चामोर्शी रोड, एसपी आॅफीस, सेमाना मार्ग, विवेकानंद नगर, गणेश कॉलनी, आरमोरी रोड, पॉलिटेक्नीक कॉलेज, गोकुलनगर, गोंडवाना युनिर्व्हसीटी, रामपुरी कॅम्प एरिया, आयटीआय चौक, बट्टुवार कॉम्प्लेक्स या ठिकाणी टॉवर होतील.कुरखेडा तालुक्यातील पलसगड, नान्ही, जांभूळखेडा, श्रीरामनगर, भटेगाव, चांदगड, कोसरी, आंधळी, खोब्रामेंढा, मालेवाडा, खरकाडा, कराडी, चरवीदंड, दादापूर, उराडी येथे टॉवर होणार आहे.देसाईगंज तालुक्यातील पोटेगाव, विर्शी तुकूम, आमगाव, देसाईगंजमधील एसडीपीओ आॅफीस, कसारी तुकूम, कोकडी, कोंढाळा येथे टॉवर होईल.अहेरी तालुक्यातील आलापल्ली, एसबी कॉलेज अहेरी, देलमरी, अहेरी बसस्थानक, खमनचेरू या ठिकाणी टॉवर होईल.सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, सिरोंचा आठवडी बाजार येथे टॉवर होईल.चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी, आष्टी, मार्र्कंडादेव, मार्र्कंडा कंसोबा, नेताजी नगर, लक्ष्मणपूर, इल्लुर, बाबा नगर, अनखोडा, मुरखळा माल, सोनापूर, कुरूड, मक्केपल्ली माल, विक्रमपूर, जामगिरी येथे टॉवर होईल.एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली, जीवनगट्टा, पांडवाही येथे टॉवर होईल.मुलचेरा तालुक्यातील गोमणी, आलापल्ली माल, मोहुर्ली, कालिनगर, मुलचेरा तहसील कार्यालय टॉवर होणार आहे.कोरची तालुक्यातील कोरची येथील बाजारपेठ, कोहका, बोटेकसा येथे टॉवर होईल.आरमोरी तालुक्यातील आरमोरीय् येथील तहसील कार्यालय, वासाळा, कासवी, किटाळी, विहिरगाव, कुकडी, भाकरोंडी, कोसबी, मांगदा, पिसेवडधा येथे टॉवर होईल.धानोरा तालुक्यातील धानोरा येथे, खुटगाव, इरूपटोला, गिरोला या ठिकाणी टॉवर होणार आहे.
दुर्गम भागातही ‘३-जी’चे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 11:54 PM
ग्रामीण भागासह दुर्गम भागातही नेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध व्हावी, यासाठी बीएसएनएलच्या वतीने ३-जी यंत्रणा असलेले नवीन ९० टॉवर उभारले जाणार आहेत. आजपर्यंत टू-जी असलेले ११६ टॉवर थ्री-जीमध्ये बदलले जातील, अशी माहिती बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक एम. ए. जीवने यांनी दिली.
ठळक मुद्देसर्वच टॉवर होणार अपग्रेड : इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळण्यास होणार मदत, कामाला सुरूवात