घाेट : चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे मागील काही दिवसांपासून बीएसएनएल कव्हरेजची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सुरू झालेली थ्रीजी सेवा सुरळीत काम करीत नसल्याने ती कुचकामी ठरत आहे. सध्या इतर कंपन्यांचे रिचार्ज महाग असल्यामुळे अनेक गोरगरीब नागरिक व ऑनलाईन अभ्यास करणारे विद्यार्थीसुद्धा बीएसएनएल सेवेचा वापर करतात. ऑनलाईन कामे करण्यासाठी इंटरनेटचेही रिचार्ज करतात; परंतु बीएसएनएलची थ्री-जी सेवा वारंवार विस्कळीत हाेते. याचा परिणाम ऑनलाईन कामांवर हाेताे. रिचार्ज करूनही काम हाेत नसल्याने नागरिकांना भुर्दंड बसताे. परंतु, या समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे, असा आराेप परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या भागातील समस्या साेडवावी.
३-जी सेवा कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:42 AM