चामोर्शी येथे शासनाच्या आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत शेतमाल धान खरेदी करण्याकरिता २० सप्टेंबरपासून नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी धान उत्पादन घेतल्याची नोंद असलेला स्वतःचा सातबारा, गाव नमुना- ८, आधार कार्डची झेराॅक्स, बँक पासबुकची झेराॅक्स, संमतीपत्र, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रे खरेदी केंद्रांच्या ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजता पर्यंत नोंदणी करण्यासाठी जमा करण्यात यावे. सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपमध्ये स्वत:च्या शेतमालाची नोंद करूनच सन २०२१-२२ या चालू सत्रातील सातबारे दिलेल्या ठिकाणी जमा करावे, असे चामोर्शी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गुरुदास चाैधरी यांनी केले आहे.
बाॅक्स
येथे करावे कागदपत्र सादर
चामोर्शी, गणपूर व कुनघाडा खरेदी केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्यांनी चामोर्शी तालुका सहकारी खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात सातबारे जमा करावे. येणापूर व सुभाषग्राम खरेदी केंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार कार्यालय, चित्तरंजनपूर (येणापूर) येथे सातबारे जमा करावे. आष्टी व गणपूर खरेदी केंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समिती कार्यालय आष्टी येथे सातबारा जमा करावे. मुलचेरा, सुंदर नगर व मथुरा नगर केंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समिती गोदाम, विवेकानंदपूर येथे नाेंदणी करावी, असे आवाहन केले आहे.