मागील वर्षीपासून रेती घटाचे लिलाव बंद असल्याने रेती चोरीला आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. रेतीची चोरी होऊ नये म्हणून महसूल विभागाने ठिकठिकाणी नदीत ट्रॅक्टर व इतर वाहने जाऊ नये म्हणून नदी घटावरील रस्त्यावर मोठे खड्डे पाडले होते. तरीही रेती तस्करांनी महसूल विभागाचे खड्डे बुजवून रात्रीच्या वेळेस रेतीची चोरी करणे सुरू केले. आरमोरी जवळील शिवणी वघाळा, रवी, सायगाव, मुलूरचक ,अरसोडा़ कनेरी व इतर अनेक नदी घाटात रात्रीच्या वेळी रेती चोरांचा शिलशिला सुरू असता. रात्र नदी घाटातून १२ वाजेपासून तर पहाटे पर्यंत रेतीची अवैधपणे चोरी सुरू असते. अधिकाऱ्याची गाडी येऊ नये म्हणून रात्री रेती तस्करांकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जाते.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेती तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू केले . आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेतीची चोरी करून अवैध वाहतूक करणाऱ्या ३४ ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे .
लाॅकडाऊनच्या काळात एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या वर्षभराच्या काळात ट्रॅक्टर दंड व राॅयल्टीची रक्कम असा एकूण ३० लाख ६६ हजार ३६३ एवढा दंड वसूल केला. रेतीची चोरी करताना ट्रॅक्टर सापडल्यास १ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात येते.