लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुष्ठरोग विभागामार्फत कुष्ठरोग्यांच्या सहवासात राहत असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ हजार ६०० व्यक्ती शोधून काढण्यात आल्या आहेत. या शोधमोहिमेत ३०१ नवीन कुष्ठरुग्ण आढळले. त्यांच्यासह रुग्णाच्या सहवासात राहणाऱ्यांना गोळ्या देऊन मार्गदर्शन केले जात आहे.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आॅक्टोबर महिन्यात कुष्ठरोग शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. आरोग्य विभाग व इतर स्वयंसेवक यांच्या मार्फत शोधमोहीम राबविण्यात आली असता, ३०१ रूग्ण आढळून आले. त्यामध्ये ८९ रूग्णांना पाचपेक्षा कमी चट्टे आढळले. यावरून त्यांचा रोग अगदी प्रारंभिक अवस्थेत आहे, तर २१२ रूग्णांवर पाच पेक्षा अधिक चट्टे आढळले. कुष्ठरोग्यांच्या सानिध्यात राहणाºया व्यक्तींना कुष्ठरोगाची लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कुष्ठरोग विभागामार्फत कुष्ठरोग्याच्या सानिध्यात आठवड्यातून २० तास राहात असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना औषध देण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. कुष्ठरोग हा अतिशय संथगतीने वाढणारा रोग आहे. सुरूवातीच्या कालावधीत याचे परिणाम दिसून येत नाही. नागरिकांमध्ये अजुनही कुष्ठरोगाविषयी जागृती नसल्याने कुष्ठरोग गंभीर स्वरूप धारण करीत नाही, तोपर्यंत दवाखाण्यात येत नाही. नियमित औषधोपचाराने कुष्ठरोगावर मात करता येते.जास्तीत जास्त कुष्ठरोगी शोधून जिल्ह्यातून कुष्ठरोगाला हद्दपार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य लाभत आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.- डॉ.अमित साळवे, सहा.संचालक, कुष्ठरोग कार्यालय गडचिरोली
शोधमोहिमेत आढळले ३०१ नवीन कुष्ठरुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:25 PM
कुष्ठरोग विभागामार्फत कुष्ठरोग्यांच्या सहवासात राहत असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ हजार ६०० व्यक्ती शोधून काढण्यात आल्या आहेत. या शोधमोहिमेत ३०१ नवीन कुष्ठरुग्ण आढळले. त्यांच्यासह रुग्णाच्या सहवासात राहणाऱ्यांना गोळ्या देऊन मार्गदर्शन केले जात आहे.
ठळक मुद्देकुष्ठरोग्यांच्या सहवासातील व्यक्ती : ५ हजार ६०० जणांना प्रतिबंधात्मक गोळ्या