शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

जिल्ह्यातील 31 हजार 795 जणांना मिळाले वनहक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 5:00 AM

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे  (वर्मा) यांच्या हस्ते नियाेजन विभागाच्या इमारतीत आयाेजित कार्यक्रमादरम्यान शनिवारी जिल्ह्यातील काही नवीन वनहक्कधारकांना पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना लवंगारे म्हणाल्या, वनहक्क पट्टे मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाबरोबर संवाद साधून कृषी योजना तसेच बँकांची मदत घेऊन शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ व नियम २००८, सुधारणा नियम २०१२ अंतर्गत जिल्हाभरात एकूण ३१ हजार ७९५ वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जमाती १७ हजार १२९ व इतर पारंपरिक १४ हजार ६६६ वनहक्क दाव्यांचा समावेश आहे. त्यांना ३७ हजार ७४० हेक्टर आर क्षेत्राचे वितरण करण्यात आले आहे. तसेच १ हजार ४२२ सामूहिक वनहक्क दावे मजूर झाले असून, त्यांना एकूण पाच लाख ३ हजार ३२२ हेक्टर आर क्षेत्राचे वितरण करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे  (वर्मा) यांच्या हस्ते नियाेजन विभागाच्या इमारतीत आयाेजित कार्यक्रमादरम्यान शनिवारी जिल्ह्यातील काही नवीन वनहक्कधारकांना पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना लवंगारे म्हणाल्या, वनहक्क पट्टे मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाबरोबर संवाद साधून कृषी योजना तसेच बँकांची मदत घेऊन शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे.आधुनिक शेतीला एकाने सुरुवात केली तर ते पाहून इतरही शेतकरी पुढे येतील. यानंतर अजून गावे जोडली जातील. वनहक्क मिळाले, आता विविध योजनांची जोड देऊन मिळालेल्या संधीचा चांगला विनियोग करा. यातून निश्चितच आपले आर्थिक उत्पन्न वाढेल, असे त्या यावेळी म्हणाल्या.कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास भागातील वनहक्क पात्र दावेदारांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी म्हणून जिल्हास्तरीय वनहक्क समिती मार्फत वनहक्क प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात १२ जणांना वनहक्क दावे वाटप केले. यामध्ये एटापल्ली तालुक्यातील सात तर आरमोरी तालुक्यातील पाच वनहक्क प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मिणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपवनसंरक्षक कुमारस्वामी हजर हाेते.

गडचिराेलीतच झाली विभागीय सुनावणी 

- जिल्हा स्तरीय समितीने वनहक्क दावे नामंजूर केल्यानंतर विभागीय स्तरावर सुनावणी होते. यानुसार जिल्ह्यातील दुर्गम भागातील अपीलधारकांना उपस्थित राहता यावे म्हणून गडचिरोलीमध्येच विभागीय स्तरावरील सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी नियोजन भवन येथे सर्व उपस्थितांची सुनावणी घेतली. यावेळी विभागीय वनहक्क समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. नागरिकांच्या साेयीसाठी विभागीयस्तरावरील सुनावणी यापुढेही गडचिराेली येथेच घेण्याची अपेक्षा गडचिराेली जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केली. 

 

टॅग्स :commissionerआयुक्तforest departmentवनविभाग