शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

गुणवंतांचा 33 सुवर्ण पदकांनी तर आचार्य पदवीने 47 जणांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 5:00 AM

दीक्षांत भाषण करताना अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान म्हणाले की, केवळ पदवी मिळाली म्हणजे झाले असे नाही. ही सुरुवात आहे. स्वत:ला, आपल्या गावाला, समाज, प्रदेश आणि देशाला समजून घ्या. आपले गाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल. मी जे काही करेल त्याचा माझ्या गावाला काय लाभ होईल, याचा विचार करा, समाजाबद्दल संवेदनशिल बना, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात मंगळवारी (दि.१२) राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यात विविध विषयांत अव्वल राहिलेल्या २५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ३३ सुवर्ण पदकांनी गौरविण्यात आले. याशिवाय आचार्य पदवी मिळविलेल्या ४७ जणांचाही यावेळी पदवी देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला मंचावर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयाेगाचे अध्यक्ष हर्ष चाैहान, राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे, प्र.कुलसचिव तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे, तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता विराजमान होते. याशिवाय कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी संजय मिना, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सीईओ कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.सुरुवातीला अतिथींचा कुलगुरूंच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कुलगुरूंनी प्रास्ताविक व अहवाल वाचक केले.

पदवी मिळवून थांबू नका, गाव समृद्ध करायावेळी दीक्षांत भाषण करताना अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान म्हणाले की, केवळ पदवी मिळाली म्हणजे झाले असे नाही. ही सुरुवात आहे. स्वत:ला, आपल्या गावाला, समाज, प्रदेश आणि देशाला समजून घ्या. आपले गाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल. मी जे काही करेल त्याचा माझ्या गावाला काय लाभ होईल, याचा विचार करा, समाजाबद्दल संवेदनशिल बना, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. 

आचार्य पदवी मिळविणारे प्रज्ञावंत 

अश्विनी महाकालकर (गणित), सुकेशनी बाेरकर (प्राणीशास्त्र), प्रवीण चटप (प्राणीशास्त्र), अर्पित धाेटे (कायदा), विवेक गाेर्लावार (समाजकार्य), कुलदीप गाेंड (शारीरिक शिक्षण), ज्ञानेश हटवार (मराठी), स्वाती वाघरे (जीवशास्त्र), नितेश रामटेके (राज्यशास्त्र), तारा धकाते (गणित), अतुल पिंपळशेंडे (प्राणीशास्त्र), विना काकडे (समाजकार्य), हर्षा भगत (वाणिज्य), प्रफुल वैद्य (इंग्रजी), नेहा टिपले (जीवशास्त्र), रतन मेश्राम (भाैतिकशास्त्र), जसबीर साेंदी (शारीरिक शिक्षण), दीपिका खंडाले (प्राणीशास्त्र), रितेश जुमळे (भाैतिकशास्त्र), माधुरी राखुंडे (वाणिज्य), सुमेध वावरे (प्राणीशास्त्र), दयानंद हिरेमठ (संगणक विज्ञान), साेनाली शेंडे (सूक्ष्मजीवशास्त्र), प्रकाश लाभसेटवार (ग्रंथालय विज्ञान ), प्रणिता गेडाम (मराठी), शारदा लांजेकर (ग्रंथालयशास्त्र), संदीप चाैधरी (समाजशास्त्र), प्रवीण बाेरकर (राज्यशास्त्र), संजीव खाेब्रागडे (इंग्रजी), सारंग खाेंड (विद्युत अभियांत्रिकी), किशाेर भैसारे (इंग्रजी), अनिल नंदेश्वर (शिक्षण), किशाेर वाहने (समाजकार्य), सविता गाेविंदवार (मराठी), राजकुमार बिरादार (समाजशास्त्र), अविनाश काळे (सूक्ष्मजीवशास्त्र), याेगिता गावंडे (इतिहास), याेगेश खेडेकर (रसायनशास्त्र), दिनेश दुर्याेधन (रसायनशास्त्र), स्मिता लांजेवार (प्राणीशास्त्र), गणेश पारधी (प्राणीशास्त्र), बद्रुनिसा खान (हिंदी), सुनीता चिटमवार (बिजनेस मॅनेजमेंट), शगुफ्ता शेख (जीवनाशास्त्र), भारती रत्नपारखी (मराठी), प्रदीप इंगाेले (शारीरिक शिक्षण), अश्विनी चाैधरी (प्राणीशास्त्र) आदींचा समावेश आहे.

 सुवर्णपदक पटकाविणारे गुणवंत

यादव नितू बिजराज (माेहसिनभाई जव्हेरी महाविद्यालय बल्लारपूर), वेलादी अमाेल माेरेश (राजे धर्मराव महाविद्यालय आलापल्ली), चिताडे वैष्ष्णव भारती भाऊजी (सरदार पटेल काॅलेज चंद्रपूर), मुथलकर दिपाली राजू (एफईएस गर्ल्स काॅलेज चंद्रपूर), मेश्राम भाग्यलक्ष्मी अरूण (एफईएस गर्ल्स काॅलेज चंद्रपूर), अलाेणे महेश शंकर (शंकरराव बेझलवार महाविद्यालय अहेरी), ठलाल मनिषा साेमनाथ (गाेंडवाना विद्यापीठ गडचिराेली), देवारे गीता सुधाकर (डाॅ. आंबेडकर काॅलेज चंद्रपूर), जांभुळे शीतल निलकंठ (आंबेडकर काॅलेज चंद्रपूर), तिवाडे काेमल अशाेक (सरदार पटेल काॅलेज चंद्रपूर), बारसागडे दिलीप केशव (आंबेडकर काॅलेज चंद्रपूर), चाैधरी रूपाली प्रमाेद (नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रह्मपुरी), पांडे साेनल सुरेश (शांताराम पाेटदुखे विधी महाविद्यालय), भाेमा कार्तिक अशाेक (शांताराम पाेटदुखे विधी महाविद्यालय), ढाेरके गाेविंदा किशाेर (शांताराम पाेटदुखे विधी महाविद्यालय), बारसागडे दिलीप केशव (डाॅ. आंबेडकर काॅलेज ब्रह्मपुरी), उरकुडे स्नेहा विलास (आदर्श महाविद्यालय वडसा), शर्मा रितिका रमेश (रेनायन्स इन्स्टिट्युट चंद्रपूर), साेनवणे अमाेल अरविंद (सर्वाेदय महाविद्यालय सिंदेवाही), जादा रूकसार रियाज (राष्ट्रपिता म. गांधी काॅलेज नागभिड), वाढई अश्विना पुंडलिक (जनता काॅलेज चंद्रपूर), मल्लेलवार शाेतिका ब्रह्महानंद (सरदार पटेल काॅलेज चंद्रपूर) आदींचा समावेश आहे. 

 

टॅग्स :universityविद्यापीठbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी