शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

३३ प्रश्नांकडे लक्ष वेधून घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2016 2:08 AM

सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी आपण २२ तारांकित व ११ लक्षवेधी सूचना असे एकूण ३३ प्रश्न पाठविले असून....

क्रिष्णा गजबे यांची माहिती : उद्योग, सिंचन,बोगस बियाणे विक्रीच्या मुद्यांवर भर देसाईगंज : सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी आपण २२ तारांकित व ११ लक्षवेधी सूचना असे एकूण ३३ प्रश्न पाठविले असून आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विविध ज्वलंत प्रश्नांवर विधानसभेचे लक्ष वेधून घेणार आहो, अशी माहिती आमदार क्रिष्णा गजबे यांनी देसाईगंज येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माहिती देताना गजबे म्हणाले, गडचिरोली जिल्हा हा राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागासलेला जिल्हा आहे. जिल्हा विकासासंदर्भात अनेकदा मुंबई गाठावी लागते. यात बराच वेळ जातो. त्यामुळे विशेष बाब या सबबीखाली गडचिरोली जिल्हा विकास प्राधिकरण तयार करून उद्योग निर्मिती करावी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावे, अशी मागणी आपण विधानसभेत लावून धरणार आहोत, असे आमदार गजबे यांनी सांगितले. कोरचीत जांभूळ प्रकल्प व्हावे, मालेवाडा पोलीस मदत केंद्राला पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात यावा, वडधा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करावी, नवीन लाडज या गावाची शासकीय अभिलेखात नोंद घेण्यात यावी, देसाईगंजात बसस्थानक उभारावे, देसाईगंजच्या दीक्षाभूमिचा विकास करण्यात यावा, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या निधीतील नियम व निकष शिथील करण्यात यावे, शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावे, मामा तलावातील अतिक्रमण हटवून या तलावातील पाण्याची क्षमता वाढविण्यात यावी, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना गोदाम उपलब्ध करून द्यावे आदी प्रश्नांचा तारांकित व लक्षवेधीमध्ये समावेश आहे, असेही आमदार गजबे यावेळी म्हणाले. यावेळी भाजपचे पदाधिकारी नाना नाकाडे हजर होते. (वार्ताहर)