मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे धान व कापसावर आलेल्या रोगराईचा यावर्षी अनेक शेतकºयांना फटका बसला. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या निकषानुसार जिल्ह्यात ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी ६९ हजार ५१५ शेतकरी पात्र ठरले आहेत.जिल्ह्यात धान या मुख्य पिकासोबत काही प्रमाणात कापसाचेही पीक घेतले जाते. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार यावर्षी १ लाख ३९ हजार ४८५ शेतकºयांनी १ लाख ७३ हजार २५९ हेक्टर क्षेत्रावर धानपीकाची लागवड केली होती. त्यापैकी ६८ हजार ६०३ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावरील धानपीकाचे मावा-तुडतुड्यामुळे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात कोरडवाहू (जिरायती) क्षेत्रावरील पीक १४ हजार ४५५ हेक्टर तर बागायती क्षेत्रावरील पीक १८ हजार ३४२ हेक्टर आहे. शासनाच्या निकषानुसार जिरायती क्षेत्रावरील ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी ९ कोटी ५६ लाख १२ हजार ५५६ रुपयांचा मदत तर बागायती क्षेत्रावरील पीकासाठी २४ कोटी ५६ लाख ५८ हजार २८५ रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.यावर्षी ८५६० शेतकऱ्यांनी ११ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. त्यापैकी ९१२ शेतकºयांच्या ५९७ हेक्टरवरील पीकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात जिरायती शेतीचे क्षेत्र ५८३ हेक्टर तर बागायती क्षेत्र अवघे १४ हेक्टर आहे. या शेतकऱ्यांना ४१ लाख ३६ हजार १४० रुपयांची मदत मिळणार आहे. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी पात्र असणाºया या शेतकऱ्यांची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे. त्यांच्यामार्फत ही माहिती राज्य शासनाकडे गेल्यानंतर शासन स्तरावर प्रत्यक्ष मदतीची रक्कम मंजूर केली जाईल. त्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा शेतकºयांना करावी लागणार आहे.शासन निर्णयानुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ दिला जाणार आहे. विशेष म्हणजे सिरोंचा आणि एटापल्ली या दोन तालुक्यातील एकही शेतकरी धान किंवा कापूस पिकाच्या नुकसानीसाठी पात्र ठरलेला नाही.६८०० ते २७ हजारापर्यंत मदत मिळणारराज्य शासनाच्या जीआरनुसार जिरायती शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. त्यामुळे मदतीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना किमान ६८०० ते जास्तीत जास्त २७ हजार एवढी मदत मिळणार आहे.कृषी विभागामुळे अहवालास विलंबजिल्हाधिकाऱ्यांनी ८ डिसेंबरला काढलेल्या आदेशानुसार १५ दिवसात पिकांच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करायचा होता. परंतु त्यासाठी कृषी विभागाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला. विशेष म्हणजे आॅक्टोबर २०१७ पर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अहवालही कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेला नाही. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या कार्यप्रमाणीवर संताप व्यक्त केला जात आहे.
३४.५४ कोटींची मदत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:13 PM
पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे धान व कापसावर आलेल्या रोगराईचा यावर्षी अनेक शेतकºयांना फटका बसला. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या निकषानुसार जिल्ह्यात ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत ....
ठळक मुद्देरोगग्रस्त पिकांचे नुकसान : ६९ हजार ५१५ शेतकरी ठरले पात्र