लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्टÑीय संपादणूक सर्वेक्षण २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण १२ तालुक्यात इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या वर्गाची संपादणूक चाचणी परीक्षा घेण्यात आली. या चाचणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्हाभरातील ३ हजार ६८० विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली.राष्टÑीय अभ्यासक्रम ठरविताना तिसरी, पाचवी व आठवीचे वर्ग अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या वर्गांची चाचणी घेऊनच अभ्यासक्रम ठरविला जातो. सध्या अस्तित्वात असलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य आहे किंवा नाही हे जाणून घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शिकण्याची अभियोग्यता समजून घेण्याच्या उद्देशाने राष्टÑीयस्तरावर एकाच दिवशी राष्टÑीय संपादणूक पातळी चाचणी परीक्षा घेण्यात आली. तिसरीच्या १ हजार १४, पाचवीच्या १ हजार २४१ व आठवीच्या १ हजार ४२५ अशा एकूण ३ हजार ६८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही प्रश्नावली देण्यात आली होती. सुमारे ३८३ शिक्षकांनी प्रश्नावली भरून दिली. परीक्षा घेण्यासाठी २९० क्षेत्रीय अन्वेशकांची नेमणूक करण्यात आली होती. जिल्हास्थळावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पथक व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे (डायट)चे बाराही तालुक्यात संपर्क अधिकारी नेमण्यात आले होते. गटसाधन केंद्रांमार्फत विशेष संनियंत्रकाचे नेमणूक करण्यात आली होती. डायटचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील, ज्येष्ठ अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक राजेश रूद्रकार, जिल्हा सहसमन्वयक विठ्ठल हांडे यांनी या परीक्षेचे नियोजन केले. सर्व क्षेत्रीय अन्वेशकांना तीनदा प्रशिक्षण देण्यात आले होते. इयत्ता तिसरी व पाचवीकरिता भाषा, गणित व पर्यावरण या विषयाकरिता एकूण ४५ गुण ठेवण्यात आले होते. आठवीकरिता भाषा, गणित, पर्यावरण या विषयाबरोबरच सामाजिकशास्त्र हा विषयसुध्दा होता. त्यामुळे आठवीची परीक्षा ६० गुणांची होती.२० शाळांची निवडअहेरी : राष्ट्रीय गुणवत्ता सर्वेक्षण २०१७ अंतर्गत सोमवारी अहेरी तालुक्यात एकाच दिवशी व एकाच वेळी २० शाळेतील इयत्ता तीसरी, पाचवी व आठवीच्या एकूण ४३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात जिल्हा परिषदेच्या आठ शाळा व खाजगी व्यवस्थापनाच्या बारा शाळांची निवड करण्यात आली होती. इयत्ता तीसरीचे १२६ विद्यार्थी, पाचवीचे १५० विद्यार्थी व इयत्ता आठवीचे १६१ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०१७ ची परीक्षा दिली. या परीक्षेकरीता डायट संस्थेकडून अन्वेक्षकांची नीयुक्ती करण्यात आली होती. डायट संस्थेकडून अहेरी तालुका संपर्क अधिकारी म्हणून कुणाल कोवे, डी. जे. गायकवाड, बी. के. गडदे, निर्मला वैद्य, गटसमन्वयक ताराचंद भुरसे, प्रकाश दुर्गे, सुषमा खराबे, अरुण जकोजवार, प्रविणा कांबळे, दिपा रामटेके, कापगते, राजू नागरे, किशोर मेश्राम, जीतेंद्र राहुड, पंकज मानकर, तेजराम दुर्गे व शिक्षण विभागच्या इतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.
३,६८० विद्यार्थ्यांनी दिली चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:55 PM
राष्टÑीय संपादणूक सर्वेक्षण २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण १२ तालुक्यात इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या वर्गाची संपादणूक चाचणी परीक्षा घेण्यात आली.
ठळक मुद्देराष्टÑीय संपादणूक परीक्षा : जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद, शिक्षकांनी भरली प्रश्नावली