ऑनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली शहराचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी ३७ वाढीव तरतूद करण्यात आली आहे.शहरवासीयांना आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आदी सोयीसुविधा पुरविणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. आरोग्य व सोयीसुविधांसाठी मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी भरीव तरतूद करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये आरोग्य व सोयीसुविधांवर केवळ ३ कोटी १४ लाख ४१ हजार रूपयांची तरतूद होती. २०१६-१७ मध्ये ५ कोटी २८ लाख ७४ हजार व २०१७-१८ मध्ये ११ कोटी २१ लाख २२ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली होती. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १५ कोटी ३३ लाख १७ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील हातपंप व पाईपलाईन लिकेज दुरूस्तीसाठी ३० लाख रूपये, नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी १० लाख रूपये, पाणीपुरवठा योजनेला आलम खरेदी करण्यासाठी सात लाख, ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी आठ लाख रूपये, १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत वॉटर वर्क, वीज बिल दुरूस्तीसाठी ८० लाख रूपये, सार्वजनिक विहिरींची सफाई व दुरूस्तीसाठी १ लाख २५ हजार रूपये, जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणकडून नगर परिषदेने कर्ज घेतले. या कर्जाची परतफेड करण्यासाठी सुमारे १ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. पंप दुरूस्तीसाठी २० लाख रूपये, फिल्टर दुरूस्तीसाठी ३ लाख ५० हजार रूपये, भूमीगत गटार योजनेच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्कासाठी एक कोटी रूपयांची तरतूद झाली आहे. पाणीपुरवठा विभागावर सुमारे ४ कोटी १५ लाख ९० हजार रूपये खर्च होणार आहेत.साफसफाईवर एकूण ५ कोटी ४८ लाख ९५ हजार रूपयांचा खर्च होणार आहे. यामध्ये वाहनांच्या दुरूस्तीसाठी ६ लाख ५० हजार, पेट्रोल, डिझेलसाठी चार लाख, पाणपोई निर्मितीसाठी १ लाख १० हजार, स्वच्छ महाराष्टÑ अभियानासाठी दोन लाख रूपये, आपत्ती व्यवस्थापनासाठी १ लाख ५० हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची नसबंदीसाठी १० हजार रूपये, दुर्बल घटकांना अंत्यसंस्कारासाठी लाकडे पुरविण्यासाठी ५० हजार रूपये, शहरातील रस्त्यांच्या बाजूला असलेले निरूपयोगी झाडे कापण्यासाठी पाच लाख रूपये, नागरिकांना कचरापेटीचे वितरण करण्यासाठी पाच लाख रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.दिवाबत्तीसाठी १ कोटी ८८ लाखांची तरतूदशहरातील पथदिव्यांच्या दुरूस्ती व इतर खर्चासाठी सन २०१८-१९ मध्ये सुमारे १ कोटी ८८ लाख १६ हजार १०० रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहराचा विस्तार होत आहे. त्याचबरोबर पथदिव्यांची संख्या तसेच विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीची लांबी वाढत चालली आहे. तसतसा दिवाबत्तीवरील खर्च वाढत चालला आहे. दिवे व इतर वस्तू खरेदीसाठी १५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. वीज खांब व इतर खर्चासाठी १ लाख रूपये, पथदिव्यांचा वीज बिल भरण्यासाठी ८० लाख रूपये, विद्युत देखभाल व दुरूस्तीसाठी ३५ लाख रूपये, जनरेटर दुरूस्ती व डिझेलसाठी एक लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी आस्थपनेवर ५० लाख, अस्थायी स्थापनेवर तीन लाख रूपयांची तरतूद करण्यात आले आहे.सार्वजनिक उद्यानांसाठी ७१ लाखशहरातील काही ओपन स्पेसवर बगीचे तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर इतर ओपन स्पेसचा विकास करण्यासाठी एकूण ७१ लाख २० हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये स्थायी आस्थापनेवर ३५ लाख १० हजार, वृक्षारोपन व ट्रीगार्ड खरेदीसाठी १० लाख रूपये, सौंदर्यीकरण व नगर उद्यानसाठी १५ लाख रूपये, कीटकनाशक खरेदीसाठी ६० हजार रूपये, लहान मुलांना खेळणे खरेदीसाठी पाच लाख रूपये, गार्डन चेअर खरेदीसाठी पाच लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.अपंगांसाठी तीन टक्के, अनुसूचित जाती व जमातीसाठी प्रत्येकी पाच टक्के निधी आरक्षित ठेवावा लागतो. त्यानुसार अपंगांसाठी १ कोटी ५५ लाख, अनुसूचित जाती व जमातीसाठी प्रत्येकी २ कोटी ५८ लाखांचा निधी आरक्षित केला आहे.
सोयीसुविधांसाठी ३७ टक्के वाढीव तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:15 AM
गडचिरोली शहराचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी ३७ वाढीव तरतूद करण्यात आली आहे.
ठळक मुद्देगडचिरोली शहराचा अर्थसंकल्प : १५ कोटी ३३ लाख १७ हजारांचा निधी; शहराच्या विकासाला मिळणार गती