लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची विविध कामे केली जातात. विशेष म्हणजे, ही कामे मजुरांमार्फत केली जात असल्याने य कामातून जिल्ह्यातील हजारो मजुरांना रोजगार मिळत असतो. रोहयो अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या विविध कामांवर एकूण ४ कोटी ५४ लाख ९२ हजार रुपयांचा खर्च झाला आहे.जिल्हा परिषदेमध्ये नरेगा विभाग असून या विभागामार्फत मजुरांमार्फत भातखाचरे निर्मिती व पुनर्जीवन, बोडी नुतनीकरण, शेततळे, माती नाला बांध आदी कामे केली जातात. सन २०१४-१५ ते २०१८-१९ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची ५०० वर कामे करण्यात आली आहे.सन २०१८-१९ या वर्षात शेततळ्यांची चार कामे करण्यात आली असून या कामांवर २.४७ लाख रुपयांचा खर्च झाला. बोडी दुरूस्तीची एकूण ११ कामे करण्यात आली असून यावर ७.८० लाख रुपयांचा खर्च झाला. एका मातीनाला बांध तयार करण्यासाठी १३ हजार रुपये खर्च करण्यात आला. तब्बल २६२ भातखाचऱ्याची कामे करण्यात आली. यावर ३८६.६२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. याशिवाय ६६ भातखाचºयाच्या पुनरूजीवनाचे काम करण्यात आले. यावर २७.९० लाख रुपये खर्च झाले. सन २०१८-१९ या वर्षभरात जलसंधारणाच्या एकूण ३४४ कामांवर एकूण ४ कोटी ५४ लाख ९२ हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.सन २०१७-१८ या वर्षात शेततळ्यांचे चार, बोडी दुरूस्तींची सहा, भातखाचºयाची ९१, एक माती नाला बांध व भातखाचरे दुरूस्तीची २९ अशा एकूण १३१ कामांवर १५१.६५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सन २०१६-१७, सन २०१५-१६ व सन २०१४-१५ या वर्षात सुध्दा शेततळे, बोडी दुरूस्ती आदीसह जलसंधारणाची विविध कामे रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आली.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने नरेगा विभागामार्फत दरवर्षी ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावर घेण्यात येणाऱ्या कामांचा कृती आराखडा तयार केला जातो. याला जिल्हा प्रशासन व शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर कामास सुरूवात केली जाते. सध्या तापमानाचा पारा वाढला असून तेंदू हंगाम सुरू असल्याने रोहयो कामावर मजुरांची अत्यल्प उपस्थिती आहे.नरेगा अंतर्गत वृक्ष लागवडही होणारजि.प. नरेगा विभागाच्या वतीने शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जातो. नरेगा विभागामार्फत गतवर्षी सुध्दा १०० वर रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावर्षीच्या पावसाळ्यात शासनाकडून मिळालेल्या उद्दिष्टानुसार विविध जातीच्या रोपट्यांची लागवड करण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी खड्डे खोदण्याचे काम करावे लागणार आहे. या कामातून शेकडो मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या योजनेमार्फत शासनाने प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी कायद्यान्वये दिली आहे.
३४४ कामांवर चार कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 10:26 PM
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची विविध कामे केली जातात. विशेष म्हणजे, ही कामे मजुरांमार्फत केली जात असल्याने य कामातून जिल्ह्यातील हजारो मजुरांना रोजगार मिळत असतो.
ठळक मुद्देहजारो मजुरांना रोजगार प्राप्त : रोजगार हमी योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे