गडचिराेली : नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यात गडचिराेली-चिमुर लाेकसभा क्षेत्रासाठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल राेजी शुक्रवारला मतदानाची प्रक्रिया घेण्यात येत आहे. तीन जिल्हयातील ६ विधानसभा क्षेत्राचा समावेश असलेल्या या लाेकसभा क्षेत्रात सकाळी ७ पासून दुपारी १ वाजतापर्यंत एकुण ४०.३१ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यापेक्षाही गाेंदिया व गडचिराेली जिल्ह्यात दुपारी १ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी अधिक हाेती.
दुपारी १ वाजतापर्यंत या लाेकसभा क्षेत्रात ८ लाख १४ हजार ७६३ पुरूष मतदारांपैकी ३ लाख ३२, ६०२ मतदारांनी मतदान केले. ८ लाख २ हजार ४३४ महिला मतदारांपैकी ३ लाख १९ हजार ३६५ महिला मतदारांनी मतदान केले. दुपारी १ वाजतापर्यंत स्त्री व पुरूष मिळूण एकूण ६ लाख ५१ हजार ९७१ मतदारांनी मतदान केले. इतर १० मतदारांनी मतदान केले. दुपारी १ वाजतापर्यंत मतदानाची एकूण टक्केवारी ४०.३१ टक्के आहे.
गडचिराेली जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ३ अशी मतदानाची वेळ आहे. त्यामुळे मतदारांनी सकाळपासूनच उन्हाची पर्वा न करता मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. मतदानाची वेळ संपूण जाईल, या भीतीने अनेक मतदारांनी भर दुपारी घराबाहेर पडून मतदान केले.
विधानसभा क्षेत्रनिहाय अशी आहे टक्केवारी
विधानसभा क्षेत्र झालेले एकुण मतदान टक्केवारी
आमगाव ........ १,२७,५९९ ......... ४८.६५
आरमाेरी ........ ९८,६८८ ............. ३८.०८
गडचिराेली .......... १,२८,६५० ....... ४२.६०
अहेरी ............... ९९,६१४ ........... ४०.६३
ब्रम्हपुरी .............. ९६,०२१ ........... ३५.३७
चिमुर ......... ...... १,०१,३९९ ................. ३६.५९