लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी जिल्हा सहकारी बँक आणि राष्टÑीयकृत बँकांचे मिळून जिल्ह्यातील ४० हजारांच्या घरात शेतकरी पात्र ठरणार आहेत. मात्र राज्य शासनाने त्या शेतकºयांच्या यादीला अजून अंतिम स्वरूप दिलेले नाही. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे यादी जाहीर करण्यास विलंब लागत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात यादीला अंतिम मान्यताच मिळाली नसल्याचे समजते.जिल्ह्यातील किती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आणि त्यांचा सातबारा कधी कोरा होणार, याची प्रतीक्षा सर्वच शेतकºयांना लागली आहे. पण अनेक अटींच्या चाळणीमुळे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी वेळ लागला. आता जिल्हास्तरावर पात्र शेतकºयांची यादी तयार झाली आहे. त्यातही केवळ गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदारांचीच माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आहे. त्यानुसार जीडीसीसी बँकेचे ३९ हजार ६३६ खातेधारक कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. परंतू काही ठिकाणी एकाच व्यक्तीचे दोन खाते तर काही ठिकाणी दोन खातेधारकांचा एकच आधार नंबर आढळला. त्यामुळे प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जीडीसीसी बँकेच्या शेतकºयांची संख्या २५ हजार ९६८ झाली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी ही पात्र शेतकºयांची संख्या ठरविली असली तरी राज्य शासनाकडून त्या यादीची स्क्रुटनी केल्यानंतर त्यातील काही नावे गळण्याची शक्यता नाकारता येत नाही.दिवाळीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समारंभात पालकमंत्र्यांच्या हस्ते १७ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. त्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. आता उर्वरित पात्र शेतकºयांची यादी ‘माझे सरकार’च्या ग्रीन सीटवर टाकण्यात आलेली नाही. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून हे काम राज्यस्तरावर सुरू आहे.शासन स्तरावर नावे न गळल्यास ४५ हजार शेतकरी ठरणार पात्रविशेष म्हणजे या कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांची यादी तयार करण्याची जबाबदारी जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे असली तरी राष्टÑीयकृत बँकांकडून कर्ज घेणाºया पात्र शेतकºयांची यादी बँकांकडून थेट राज्य शासनाकडे पाठविली जात आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर ती यादी उपलब्धच नसल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. तरीही या बँकांचे जवळपास २० हजार शेतकरी पात्र ठरल्याचे सांगितले जाते. हे २० हजार आणि जीडीसीसी बँकेचे २६ हजार अशा एकूण ४६ हजार पात्र शेतकºयांपैकी शासन स्तरावर ५ ते ६ हजार शेतकºयांची नावे गळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. तसे झाले तरी जिल्हाभरातील किमान ४० हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळणार हे निश्चित आहे.कोणीही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही आणि कोणीही अपात्र शेतकरी लाभार्थी ठरणार नाही याची दक्षता घेत आम्ही अचूक यादी तयार करण्याचा प्रयत्न केला. यात अनेक अडचणीही आल्या. त्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांनी अतिरिक्त वेळ देऊन हे काम शक्य तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न केला. आता अंतिम यादी मुंबईवरून जाहीर होईल.- सीमा पांडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था
४० हजारांवर शेतकºयांना मिळणार कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:36 AM
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी जिल्हा सहकारी बँक आणि राष्टÑीयकृत बँकांचे मिळून जिल्ह्यातील ४० हजारांच्या घरात शेतकरी पात्र ठरणार आहेत.
ठळक मुद्देजीडीसीसी बँकेचे सर्वाधिक : शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी अडली यादी