शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

कृषी निविष्ठांचे ४१ नमुने आढळले अप्रमाणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 6:00 AM

खते, बियाणे व कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात बियाणे विक्रीची ४२५, खत विक्रीची ६६२ व कीटकनाशक विक्रीची ३३६ दुकाने आहेत. निकृष्ठ दर्जाच्या बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत काही नमुने तपासले जातात. मागील वर्षीच्या खरीप हंगामात बियाणांचे ४६० नमुने तपासण्यात आले.

ठळक मुद्दे२७ प्रकरणे न्यायालयात : ९५८ नमुने तपासले, निकृष्ट बियाणे, खत विक्रीला प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाने वर्षभरात रासायनिक खते, कीटकनाशके व बियाणांचे ९५८ नमुने तपासले असता त्यातील ४१ नमुने अप्रमाणित असल्याचे आढळून आले आहे.खते, बियाणे व कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात बियाणे विक्रीची ४२५, खत विक्रीची ६६२ व कीटकनाशक विक्रीची ३३६ दुकाने आहेत. निकृष्ठ दर्जाच्या बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत काही नमुने तपासले जातात. मागील वर्षीच्या खरीप हंगामात बियाणांचे ४६० नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ६ नमुने अप्रमाणित आढळून आले. त्यापैकी ५ नमुन्यांविरोधात न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे, तर १ नमुना ताकीदीस पात्र ठरला आहे. रासायनिक खताचे ३९८ नमुने घेतले असता ३१ नमुने अप्रमाणित आढळले.९ नमुने ताकीद पात्र तर २२ नमुने कोर्ट केस पात्र ठरले आहेत. कीटकनाशकांचे ९२ नमुने घेतले असता ४ नमुने अप्रमाणित आढळले आहेत.कधीकधी बियाणे व खतांची मागणी एकावेळेस वाढते. अशावेळी काही दुकानदार शेतकऱ्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा उठवत ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिक दराने खत व बियाणांची विक्री करतात. याचा मोठा फटका शेतकºयाला बसते. याप्रकारांवर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने १३ भरारी पथकांची निर्मिती केली आहे. प्रत्येक पथकाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच कृषी निविष्ठांबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. अनेक कृषी केंद्र चालक शेतकºयांची फसवणूक करतात. शेतकºयांनी तक्रार केल्यानंतर संबंधित कृषी केंद्र चालकाची चौकशी होणे गरजेचे आहे.बनावट बिलांवर बियाणांची विक्रीकोणत्याही दुकानदाराने माल खरेदीचे ओरिजनल बिल देणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश बियाणे दुकानदार शेतकºयांना ड्युप्लीकेट बिल देतात. बियाणांच्या पॉकेटवर अतिशय जास्त प्रमाणात किमंत लिहीली राहते. त्यापैकी थोड्या कमी किमंतीला बियाणे विकले जाते. शेतकरी निघून गेल्यानंतर त्याच्याच नावाने ओरीजनल बिल बनविले जाते त्यात सदर बियाणांची किमंत आणखी कमी दाखविली जाते. हा प्रकार सर्रास चालत असला तरी आजपर्यंत या प्रकरणी एकाही दुकानावर कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष. भरारी पथकाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र