लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारत सरकारच्या ग्रामिण विकास मंत्रालयांतर्गत बेरोजगार युवा वर्गाला स्वयंरोजगार उभारणीस चालना देण्यासाठी बँक आॅफ इंडियाच्या मदतीने ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून (आरसेटी) प्रशिक्षण दिले जात आहे. २०१५ पासून आतापर्यंत १४२ प्रशिक्षण कार्यक्रमांमधून ४१२६ लोकांना प्रशिक्षित करण्यात आल्याची माहिती सदर संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.आरसेटीचे संचालक एस.पी. टेकाम, वरिष्ठ प्रशासन अधिकारी पी.डी. काटकर यांनी आतापर्यंतच्या कामाचा आढावा थोडक्यात सांगून जिल्ह्यातील महिला-युवतींसह बेरोजगारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.बँक आॅफ इंडियाच्या सीएसआर निधीतून या प्रशिक्षणाचा खर्च भागविला जात आहे. स्वयंरोजगार उभारण्यासाठी विविध खाद्यपदार्थ निर्मिती, मच्छीपालन, मधमाशी पालन, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, रेशिमकोश उत्पादन, ब्युटी पार्लर, अगरबत्ती उद्योग, कुक्कुटपालन, बांबू हस्तकला, नळ दुरूस्ती व फिटींग, बकरी पालन, भाजीपाला लागवड, वाहन चालन आदी अनेक प्रकारचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते. १८ ते २५ वयोगटातील प्रशिक्षणार्थ्यांना त्यासाठी प्राधान्य असून प्रशिक्षणार्थ्यांच्या निवासाचीही सोय केली जाते. एका प्रशिक्षण सत्रात ३० जण असे वर्षाचे २५ प्रशिक्षण सत्र घेतले जातात. संबंधित विषयांच्या तज्ज्ञ लोकांना त्यासाठी अतिथी प्रशिक्षक म्हणून बोलविले जात असल्याची माहिती काटकर यांनी दिली. अलिकडे या प्रशिक्षण सत्रांनी गती पकडली आहे. नवीन आर्थिक वर्षाचे नियोजनही करण्यात आले आहे.महिला प्रशिक्षणार्थींची संख्या अधिकआतापर्यंत मोफत प्रशिक्षण सत्रांमध्ये सहभागी झालेल्या ४१२६ जणांमध्ये २३८६ महिला आणि १७४० पुरूषांचा समावेश आहे. त्यातील २०४० प्रशिक्षणार्थी बीपीएल गटातील होते. प्रशिक्षित झालेल्यांपैकी २८२ जणांनी विविध बँकांकडून ५ कोटी ५८ लाख ३८ हजार रुपयांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले. मुद्रा योजनेअंतर्गत १० लाखापर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही तारण ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन व्यवसाय सुरू करावेत, अशी अपेक्षा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.गडचिरोली राज्यात दुसऱ्या क्रमांकावरगडचिरोलीत २०१० पासून आरसेटीने हे प्रशिक्षण सुरू केले असले तरी सुरूवातीला अनेक अडचणींनो या संस्थेला तोंड द्यावे लागले. त्यामुळे २०१० पासून या कामाला गती आली. सध्या प्रशिक्षण, कर्जपुरवठा आदी बाबींमध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कारागृह बंदींनी घेतले ८.५ लाखांचे उत्पन्नआरसेटीच्या वतीने गडचिरोलीच्या खुल्या कारागृहातील ६८ बंदींनाही प्रशिक्षित करण्यात आले. भाजीपाला लागवडीच्या प्रशिक्षणानंतर या बंदींनी गेल्यावर्षी ८ लाख ५० हजारांचे उत्पन्न कारागृहाच्या शेतातून घेतल्याची माहिती पी.डी.काटकर यांनी दिली. त्या बंदींना महिलांकडून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला जातो. त्यावेळी हे बंदी भावूक होत असल्याचे ते म्हणाले.
‘आरसेटी’कडून ४१२६ जणांना कौशल्य प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:46 PM
भारत सरकारच्या ग्रामिण विकास मंत्रालयांतर्गत बेरोजगार युवा वर्गाला स्वयंरोजगार उभारणीस चालना देण्यासाठी बँक आॅफ इंडियाच्या मदतीने ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून (आरसेटी) प्रशिक्षण दिले जात आहे.
ठळक मुद्दे२८२ जणांनी घेतले कर्ज : स्टार्ट अप योजनेअंतर्गत बँकांकडून कर्ज पुरवठा