लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित होती. ही कामे आता मार्गी लागणार आहे. २०१६-१७ मधील निधीतून २०४ किलोमीटर तर २०१७-१८ मधून २१० किलोमीटर रस्त्यांच्या कामांना जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे. या कामांसाठी आता निविदा काढण्याची तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे.यापूर्वीच्या पदाधिकाºयांच्या कार्यकाळात २०१६-१७ मधील ४० कोटींच्या रस्ते बांधकामाच्या निविदांवर आक्षेप घेण्यात आल्याने ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. त्यामुळे वर्षभरातही त्या निविदा काढणे शक्य झाले नाही. आता जि.प.बांधकाम तो निधी वापरण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही वर्षाचे प्रस्ताव सादर केले. ६ जुलैच्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत आणि ३ आॅक्टोबरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही वर्षाच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली. याशिवाय ग्रामविकास विभागाच्या ७ आॅक्टोबरच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यामुळे आता सर्व कामांचे अंदाजपत्रक व निविदा स्तराचे काम सुरू आहे.२०१६-१७ मध्ये जिल्हा परिषदेने १७१.९० किलोमीटर ग्रामीण रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण केले. याशिवाय ३२.१० किलोमीटर इतर जिल्हा मार्गांचे खडीकरण व डांबरीकरण केले. मात्र जिल्हा निधीतील इतर रस्ते कामे प्रलंबित होती.आता ३०५४ आणि ५०५४ या हेडमधून २०१६-१७ मध्ये ४१ किलोमीटर ग्रामीण रस्त्यांचा तर १६३ किलोमीटर जिल्हा रस्त्यांचा विकास अशी एकूण २०४ किलोमीटर रस्त्यांची कामे केली जाणार जाणार आहेत. त्यासाठी ५१.५२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.सन २०१७-१८ मध्ये ६० किलोमीटर ग्रामीण रस्त्यांचा तर १५० किलोमीटर जिल्हा रस्त्यांचा असा एकूण २१० किलोमीटर रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी ५२ कोटी रुपये खर्च येणार आहे.बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनीही खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन ही कामे दर्जेदार आणि लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत.- तर निधी जाणार परतसन २०१६-१७ मधील कामांच्या निविदांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. निविदा प्रक्रिया होऊन कार्यादेश देण्याची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रवीण बेंडकुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च न झाल्यास तो परत जाणार आहे. त्यामुळे ही कामे तातडीने सुरू केली जातील, असेही त्यांनी सांगितले.ग्रामीण रस्त्यांच्या कामात अडचणीग्रामीण भागातील रस्त्यांची कामे करण्यास कंत्राटदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. किमान ३ कंत्राटदारांच्या निविदा येणे गरजेचे असते. तीन वेळा निविदा बोलवूनही ३ निविदा न आल्यास निविदा रकमेपेक्षा अधिक दराने आलेल्या निविदेलाही मान्यता द्यावी लागते.वन कायद्यामुळेही जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांना अडचणी येतात. अहेरी, एटापल्ली, भामरागड तालुक्यांसह चामोर्शी तालुक्यातही चपराळा अभयारण्यामुळे १० ते १५ टक्के कामांच्या डांबरीकरणात अडचणी येतात. याशिवाय नक्षल्यांच्याही अडचणींमुळे कामे होत नाहीत.
४१४ किमी रस्त्यांची कामे मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:35 PM
जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित होती. ही कामे आता मार्गी लागणार आहे. २०१६-१७ मधील निधीतून २०४ किलोमीटर तर २०१७-१८ मधून २१० किलोमीटर रस्त्यांच्या कामांना जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे.
ठळक मुद्देदोन वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार : १०४ कोटींच्या कामांना लवकरच सुरूवात