जीर्ण इमारतीतूनच कारभार : नव्या १४ इमारतींचे काम प्रगतिपथावरगडचिरोली : गाव विकासाचा नियोजनबध्द आराखडा तयार करून गावाचा विकास साधण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आहे. मात्र गाव विकासाचे नियोजन करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ४६७ ग्रामपंचायतीपैकी ४१ ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्णावस्थेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जीर्ण इमारतीमुळे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.जिल्ह्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्णावस्थेत असून मोळकडीस आल्या आहेत. अशा इमारतींमुळे पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ग्रामपंचायतीचा कारभार योग्यरीतीने पार पाडावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रशस्त ग्रामपंचायत भवन असणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा निर्मितीनंतरच्या ३२ वर्षात या ४१ ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत मिळाली नाही. याबाबत दखल घेऊन जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या पुढाकारातून राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतींच्या नव्या इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. जीर्ण झालेल्या ४१ ग्रामपंचायतीमधूनच नव्या इमारतीसाठी १२ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली पं.स.तील गिलगाव, दिभना, चुरचुरा माल, दर्शनी माल, विहिरगाव, कोटगल, मारोडा आदी ग्रा.पं.च्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. धानोरा तालुक्यातील रेखाटोला मुरूमगाव, कुरखेडा पंचायत समितीतील रानवाही, कातलवाडा, कोरची पंचायत समितीतील कोरची, सातपुती, नवरगाव, चामोर्शी पं.स.तील दुर्गापूर, मुलचेरा पं.स.तील बोलेपल्ली ग्रा.पं. इमारत जीर्णावस्थेत आहे. अहेरी पं.स. अंतर्गत मड्रा, गोंविदगाव, वट्रा (खू), क्रिष्टापूर दौड, रेंगुलवाही, खमनचेरू आदी ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. एटापल्ली तालुक्यातील चोखेवाडा, कांदोळी, दिडंवी, वांगेतूरी, वडसाखुर्द, मानेवारा, सेवारी व भामरागड तालुक्यातील कोठी, इरकडुम्मा, पल्ली, येचली, आरेवाडा, मिरगुंळवंचा, होड्री तसेच सिरोंचा पं.स.तील विठ्ठलरावपेठा, मंदिकुंठा, रामजापूर वेस्ट लॅ., कोपला, पत्तागुड्डम आदी ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण झाल्या असून मोडकडीस आल्या आहेत. ठाकरी व फोकुर्डी ग्रा.पं.ची इमारत निर्लेखीत करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)१२ लाखांतून उभारणार ग्राम पंचायत इमारतराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामास मंजुरी मिळाली आहे. १२ लाख रूपयांच्या निधीतून एका ग्रामपंचायतीची इमारत उभारण्यात येणार आहे. १४ ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या बांधकामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली . १४ पैकी काही ग्रामपंचायत इमारतीचे काम नुकतेच सुरू झाले आहे तर काहिंचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. मंजूर झालेल्या १४ ग्रा.पं.मध्ये गडचिरोली पं.स.तील राजोली विहिरगाव, चामोर्शी पं.स.तील ठाकरी, जयरामपूर, कोरची, मुलचेरा पं.स.तील बोलेपल्ली, सिरोंचा पं.स.तील विठ्ठलरापेठा, अहेरी पं.स.तील खमनचेरू, इष्टापूर दौड, एटापल्लीतील चोखेवाडा व भामरागड पं.स.तील धिरंगी, कुव्वाकोडी, आरेवाडा, नेलगुंडा आदींचा समावेश आहे.
४१ ग्रा.पं. इमारती जीर्ण
By admin | Published: November 01, 2015 1:59 AM