महाराजस्व अभियान : बाम्हणी येथे ९५ जणांची आरोग्य तपासणीगडचिरोली : महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यातील बाम्हणी येथे मंगळवारी ग्रामरोजगार दिनाचे औचित्य साधून ४३७ दाखल्यांचे वाटप गरजूंना करण्यात आले. या शिबिरात आरोग्य विभागाच्या वतीने ९५ जणांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. वन विभागामार्फत ३० प्रकरणेही निकाली काढण्यात आली. उद्घाटन सरपंच वंदना राऊत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डी. एस. भोयर होते. प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी व्ही. यू. पचारे होते. कार्यक्रमाला नायब तहसीलदार एन. डी. भूरसे, ग्रामसेवक एस. यू. मंगर, मंडळ अधिकारी नरेश वाते, पोलीस पाटील वाढई, तलाठी डी. एस. डोंगरे, व्ही. एन. ढोरे, जे. आर. ठोंबरे, व्ही. पी. काटकर, डी. डी. कुळमेथे उपस्थित होते. शिबिरात विविध विभागाच्या वतीने स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान वन विभागांतर्गत ३० प्रकरणे निकाली काढण्यात आली. आरोग्य विभागामार्फत ९५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिधापत्रिका तयार करणे, नाव कमी करणे, नावे वाढविणे आदी कामेही करण्यात आली. ग्राम पंचायतींमार्फत ७० रहिवासी दाखले, ५५ बीपीएल, ८५ नमूना- ८, २९ सातबारा, ८- अ २१, रहिवासी दाखले ५८, उत्पन्न ६७, कुटुंब विवरण ७, फेरफार अर्ज २, उत्पन्न दाखले २६, अधिवास प्रमाणपत्र ९ वितरित करण्यात आले. आभार ढोरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
गरजूंना ४३७ दाखल्यांचे वाटप
By admin | Published: May 25, 2016 1:48 AM