लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसंख्या वाढीबरोबरच जमिनीचे तुकडे वाढत चालले आहेत. त्यामुळे शेतजमिनीची प्रती शेतकरी धारण क्षमता कमी होत चालली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एक हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेले ४५ टक्के शेतकरी आहेत.कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८५५ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी २ लाख २२ हजार ७३० हेक्टर शेत जमीन धारण केली आहे. त्यामध्ये अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ५७ हजार ३४२ एवढी आहे. या शेतकऱ्यांनी केवळ ३० हजार ५९३ हेक्टर शेतजमीन धान केले आहे. ४१ हजार ४८८ शेतकºयांकडे एक ते दोन हेक्टर दरम्यान जमीन आहे. या शेतकऱ्यांचे धारण क्षेत्र ५८ हजार ७७३ एवढे आहे. तर दोन हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन असलेले ३६ हजार २५ शेतकरी आहेत. ज्या शेतकºयांनी सुमारे १ लाख ३३ हजार ३६० हेक्टर शेतजमीन धारण केली आहे.एक हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असल्यास यामध्ये कुटुंबाचा प्रपंच भागविणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक युवक शेतीला रामराम ठोकून शहरात रोजगार शोधत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केवळ खरीपाच्या हंगामात केली जाते. धानाच्या शेतीत फारसा फायदा मिळत नाही. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने इतर पिके सुध्दा घेणे शक्य होत नाही.यांत्रिक शेती अवघडयांत्रिक पध्दतीने शेती करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच तो शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. अल्पभूधारक शेतकरी यांत्रिक पध्दतीने शेती करू शकत नाही.केवळ मनुष्यबळाच्या भरवशावर शेती केल्याने शेतीचा खर्च वाढतो व उत्पादनही कमी होते. त्यामुळे आता शासन सामुहिक शेतीवर भर देत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सामुहिक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे.
४५ टक्के शेतकरी अत्यल्प भूधारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:07 PM
लोकसंख्या वाढीबरोबरच जमिनीचे तुकडे वाढत चालले आहेत. त्यामुळे शेतजमिनीची प्रती शेतकरी धारण क्षमता कमी होत चालली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एक हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेले ४५ टक्के शेतकरी आहेत.
ठळक मुद्देतुकडे वाढले : २५ टक्के शेतकऱ्यांकडे निम्मी शेतजमीन