शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

भाग्यश्रीला ४५ हजारांची मदत

By admin | Published: March 11, 2017 1:38 AM

देचलीपेठा येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री लक्ष्मण दुर्गे ही विद्यार्थीनी कॅन्सरने ग्रस्त असून सध्या

पोलीस विभागाचे सहकार्य : देचलीपेठा येथील कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनी जिमलगट्टा : देचलीपेठा येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री लक्ष्मण दुर्गे ही विद्यार्थीनी कॅन्सरने ग्रस्त असून सध्या तिच्यावर मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. उपचारासाठी चार लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. पोलीस विभाग तसेच पत्रकार संघाने पुढाकार घेत तिला ४५ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या पुढाकारातून उपपोलीस स्टेशन जिमलगट्टा, मरपल्ली, रेपनपल्ली, दामरंचा, देचलीपेठा येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग्यश्रीच्या उपचारासाठी ४० हजार २५० रूपयांचा निधी जमा केला व सदर निधी जिमलगट्टा पत्रकार संघाकडे सुपूर्द केला. येथील पत्रकार संघाने भाग्यश्री दुर्गे हिच्या बँक आॅफ इंडिया अहेरीच्या शाखेत सदर रक्कम जमा केली. ग्रामीण पत्रकार संघ जिमलगट्टा व तालुका संघर्ष समिती जिमलगट्टा यांच्यावतीने पाच हजार रूपयांची आर्थिक मदत कॅन्सरग्रस्त भाग्यश्रीला देण्यात आली. जिमलगट्टा येथे नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकातून पत्रकार संघाकडे निधी जमा झाला होता. (वार्ताहर)