लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी भरघोष योगदान देणाºया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४९ जवानांना आंतरीक सुरक्षा सेवा पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार गडचिरोली येथील एमआयडीसी परिसरात स्थित सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये पोलीस महानिरिक्षक राजकुमार व पोलीस उपमहानिरिक्षक टी. शेखर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट जिजाऊ सिंह, ३७ व्या बटालियनचे कमांडंट श्रीराम मिना, ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवा शंकरे, नवव्या बटालियनचे कमांडंट रवींद्र भगत, द्वितीय कमांडंट कुलदीप खुराणा, टी. के. सोळंकी यांच्यासह सीआरपीएफचे अधिकारी व जवान उपस्थित होते.आंतरीक सुरक्षा सेवा पदक गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेल्या पाच बटालियनच्या जवानांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सीआरपीएफचे पोलीस महानिरिक्षक राजकुमार यांनी मार्गदर्शन केले. १९२ बटालियनचे द्वितीय कमांडंट कुलदीप खुराणा यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कुशाद प्रसाद, आर. थांबी, रामचंद्र नैताम, एस. डी. नाईक, संजय सिंह, रियाज अहमद, पी. देवराज, एम. राजा बाहु, सुरेश उईके, सतीश कुमार व अन्य जवानांना प्रदान केले.
४९ जवानांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 10:29 PM
जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी भरघोष योगदान देणाºया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४९ जवानांना आंतरीक सुरक्षा सेवा पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
ठळक मुद्देपोलीस महानिरिक्षकांच्या हस्ते प्रदान : नक्षलग्रस्त भागात सुरक्षा देणाऱ्यांचा गौरव