गडचिराेली : पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थी शाळेत येण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनींची गरज लक्षात घेऊन गडचिराेली आगारामार्फत मानव विकास मिशनच्या ४९ बसेस शालेय मार्गावर साेडल्या जात आहेत. ३० जानेवारीपर्यंत गडचिराेली आगाराअंतर्गत येत असलेल्या सात तालुक्यांमधील १ हजार ४९ विद्यार्थिनींना पासचे वाटप करण्यात आले आहे.
पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींची वाहतूक करण्यासाठी शासनामार्फत गडचिराेली आगाराला ४९ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेस विद्यार्थ्यांच्या मार्गावर त्यांच्या शाळेच्या वेळेत साेडणे अपेक्षित आहे. काेराेनामुळे वर्षभरापासून शाळा बंद हाेत्या. २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे व २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवित आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या माेफत प्रवासासाठी शासनामार्फत अहिल्याबाई हाेळकर याेजना व मानव विकास मिशन या दाेन याेजना राबविल्या जातात. शाळा सुरू हाेताच विद्यार्थिनींना पास देण्यास सुरुवात झाली आहे. मुख्याध्यापकांनी कळविलेल्या शाळेच्या वेळेनुसार बसेस साेडल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींचा शालेय प्रवास सुकर हाेण्यास मदत हाेत आहे.
बाॅक्स....
सावलीसाठी स्वतंत्र बसेस
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली हा तालुका मानव विकास याेजनेअंतर्गत येतो. या तालुक्यातील सावली, व्याहाड, हिरापूर, साेनापूर, माेखाळा, सामदा, चकपिरंजी आदी गावांमधील शेकडाे विद्यार्थिनी गडचिराेली येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थिनींसाठी दरदिवशी बसेस साेडल्या जात आहेत.
काेट...
गडचिराेली आगारात मानव विकास मिशनच्या ४९ बसेस आहेत. मुख्याध्यापकांच्या मागणीनुसार या बसेस संबंधित मार्गावर व त्यांच्या वेळेनुसार साेडल्या जात आहेत. मानव विकास मिशनच्या बसेसबाबत काही तक्रारी असल्यास पालक, मुख्याध्यापक किंवा विद्यार्थ्यांनी आपल्याकडे सादर कराव्यात. त्यांच्या सूचनांनुसार याेग्य ताे बदल केला जाईल.
- मंगेश पांडे, आगारप्रमुख, गडचिराेली
काेट....
१ जानेवारीपर्यंत मानव विकास मिशनच्या बसेस वेळेवर येत नव्हत्या. आता मात्र वेळेवर येत आहेत. मानव विकास मिशनच्या बसेसमुळे विद्यार्थिनींची साेय झाली आहे.
- आचल झाेडगे, विद्यार्थिनी
बाॅक्स....
१०७२
जिल्ह्यात सुरू असलेल्या शाळा
..................
विद्यार्थिनींची संख्या
१२६५०
पाचवी ते आठवी
..............
११५२४
नववी ते बारावी