जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली आहे. आता ३६३९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५६८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. मंगळवारी नोंदविलेल्या ११ नवीन मृत्यूंमध्ये ता. चामोर्शी येथील ६० वर्षीय पुरुष, अहेरी येथील ३० वर्षीय पुरुष, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया येथील ५३ वर्षीय पुरुष, धानोरा येथील ३५ वर्षीय पुरुष, चिमूर, जि. चंद्रपूर येथील ५८ वर्षीय पुरुष, कुरखेडा तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष, मुलचेरा येथील नवजात मुलगी, अहेरी येथील ५२ वर्षीय महिला, देसाईगंज येथील ७० वर्षीय पुरुष, गोंडपिपरी, जि. चंद्रपूर येथील ६५ वर्षीय महिला, अहेरी, जि. गडचिरोली येथील ४६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण १४ टक्के असून, मृत्यूदर २.१९ टक्के आहे.
नवीन ३७२ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ९३, अहेरी तालुक्यातील ५०, आरमोरी ४१, भामरागड तालुक्यातील ७, चामोर्शी तालुक्यातील ५२, धानोरा तालुक्यातील १२, एटापल्ली तालुक्यातील १४, कोरची तालुक्यातील ३, कुरखेडा तालुक्यातील १८, मुलचेरा तालुक्यातील ३४, सिरोंचा तालुक्यातील २६ तर देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये २२ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ४९० रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १८८, अहेरी ३२, आरमोरी ३५, भामरागड २१, चामोर्शी ४५, धानोरा १९, एटापल्ली १२, मुलचेरा १३, सिरोंचा ४५, कोरची १२, कुरखेडा २६ तसेच देसाईगंज येथील ४२ जणांचा समावेश आहे.