लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आ.कृष्णा गजबे यांच्या मागणीची व पाठपुराव्याची दखल घेऊन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुरखेडा शहरातील विकास कामांसाठी पाच कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता या निधीतून कुरखेडा शहराच्या विविध वॉर्डात पायाभूत सुविधा होणार आहेत.१७ जुलै रोजी मंगळवारला नागपूर येथील विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आ.कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात कुरखेडा नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांना कुरखेडा शहरातील विविध समस्या सांगितल्या. यापूर्वी शासनस्तरावर निवेदने देऊन लक्ष वेधण्यात आल्याचेही त्यांना सांगण्यात आले. दरम्यान कुरखेडा शहराच्या विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने पाच कोटी रूपये मंजूर झाले अशी माहिती ना.मुनगंटीवार यांनी आ.कृष्णा गजबे व नगर पंचायतीच्या शिष्टमंडळास दिली.याप्रसंगी विद्यापीठाचे सिनेट सदस्य चांगदेव फाये, न.प.उपाध्यक्ष अरविंद गोडेफोडे, भाजपचे गटनेते नागेश फाये, नगरसेवक अॅड.उमेश वालदे, बबलू हुसैनी, नगरसेविका नंदिनी दखणे, स्वाती नंदनवार, दीपाली देशमुख, शायेदा मुगल, अर्चना वालदे, जगदीश दखणे आदी उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी पाच कोटी रूपये मंजूर केल्याने मुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री, खासदार यांचे आ.गजबे यांनी आभार मानले आहेत.
कुरखेडाच्या विकासासाठी पाच कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:41 AM