शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

रोहयोतून पाच लाख मनुष्य दिवस रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:19 AM

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्दे१ लाख ७८ हजार जॉब कार्डधारक : एप्रिलपासून २ हजार १९१ कुटुंबांना दिले १०० दिवसांचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात शेती व्यतिरिक्त रोजगाराचे साधन नाही. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतीतही बारमाही रोजगार मिळत नाही. केवळ दोन ते तीन महिनेच रोजगार उपलब्ध होते. प्रती शेतकरी जमीनधारण क्षमता सुध्दा कमी असल्याने शेतकऱ्यांनाही मोलमजुरी करावीच लागते. इतर रोजगारांचे साधन उपलब्ध नसल्याने धानाचा हंगाम संपल्याबरोबर शेतकरी रोहयोच्या कामांची मागणी करतात. जवळपास चार ते पाच महिने रोहयोची कामे चालत असल्याने यातून मजुरांना रोजगार उपलब्ध होते.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ७८ हजार जॉब कार्ड आहेत. त्यातील १ लाख २२ हजार जॉबकार्डधारक अ‍ॅक्टिव्ह आहेत. सदर मजूर वेळोवेळी रोजगाराची मागणी करतात. धानाचा हंगाम संपल्याबरोबर रोहयो कामांची मागणी होत असल्याची बाब प्रशासनाला माहित असल्याने आधीच कामांना मंजुरी देऊन रोजगाराची मागणी झाल्याबरोबर काम उपलब्ध करून दिले जाते. रोहयोच्या माध्यमातून प्रामुख्याने मजगी, शेततळे, विहिरी, तलाव, बोड्यांची दुरूस्ती, पांदन रस्त्यांची निर्मिती आदी कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यानंतरच सुरूवात होतात. धानाचे पीक निघाल्यानंतर मजगीची कामे सुरू होतात. आता धानपीक निघाले असल्याने रोहयोची कामे करण्यास जमीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कामाची मागणी होताच काम उपलब्ध करून दिले जात आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नियमानुसार प्रत्येक कुटुंबाला वर्षभरातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो. १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला नसताना एखाद्या मजुराने कामाची मागणी केल्यास व काम उपलब्ध नसल्यास बेरोजगारी भत्ता सुध्दा द्यावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ९९१ कुटुंबांना यावर्षीच्या आर्थिक वर्षात १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. २०१७-१८ या वर्षात ८ हजार ६७६, २०१६-१७ या वर्षात ७ हजार ६४७ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला होता. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक १५ हजार ८३० कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला.कामाची मागणी वाढलीधानाचे पीक निघाल्याने आता ग्रामीण व दुर्गम भागातील मजुरांना रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे कामाची मागणी वाढली आहे. तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू होईपर्यंत मजूर आता रोहयो कामांवर राहणार आहेत. रोहयोच्यामाध्यमातून विशेष करून मजगीची कामे केली जात असल्याने धानाच्या बांध्या आता रिकाम्या झाल्याने रोहयोची कामे करण्यास प्रशासनालाही सोयीचे झाले आहे. यावर्षी काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने रोहयो कामांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. गचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोहयोच्या कामांची मागणी होत असल्याने त्यानुसार प्रशासन नियोजन करते.

टॅग्स :jobनोकरी