लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रेती, माती, मुरूम व इतर गौण खनिज तस्करीप्रकरणी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाडसत्र राबवून गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत एकूण ९२ प्रकरणे उघडकीस आणली. या कारवायांमध्ये ५० लाख ८५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.जिल्हा प्रशासनातर्फे शासनाला गौणखनिजाच्या माध्यमातून रॉयल्टी व महसूल प्राप्त व्हावा, या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने दरवर्षी रेतीघाटाची आॅनलाईन लिलाव प्रक्रिया राबविली जाते. याशिवाय माती व मुरूम खाणीची लिलाव प्रक्रिया राबवून संबंधित कंत्राटदारांना लिज दिली जाते. मात्र ही लिज घेताना कंत्राटदाराना गौण खनिज खणन व वाहतुकीबाबतचे नियम पाळावे लागतात. परंतू कमी दिवसात अधिक पैसा कमविण्याच्या उद्देशाने अनेक कंत्राटदार अवैधरित्या रेती व मुरूमाचे खणन करून वाहतूक करतात. अशा बेकायदेशीर वाहतुकीवर आळा घालण्याचा प्रयत्न तालुका व जिल्हा प्रशासनातर्फे केला जातो.अवैध गौण खनिज खणन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार तालुकास्तरावर स्वतंत्र पथक गठीत केले आहेत. या पथकांमध्ये महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या बºयाच तालुक्यात अवैधरित्या गौणखनिज खणन व वाहतुकीचा प्रकार विशेषत: रात्रीच्या सुमारास चालत असतो. नियमापेक्षा अधिक ब्रास रेतीचे खणन अनेक रेती घाटातून होत असते. या सर्व प्रकारावर करडी नजर ठेवून महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी धाडसत्र राबवित असतात.१ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याच्या सहा उपविभागात महसूल अधिकारी व कर्मचाºयांनी धाडसत्र राबवून संबंधित कंत्राटदारांकडून ५० लाख ८५ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. देसाईगंज उपविभागात सर्वाधिक ३२ प्रकरणांचा निपटारा करून २१ लाख ६० हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्या खालोखाल अहेरी उपविभागात १६ प्रकरणातून १० कोटी ९४ लाख ६०० रूपयांचा दंड कंत्राटदारांकडून वसूल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान महसूल विभागाने रेती वाहतुकीवर असलेले अनेक ट्रॅक्टर व ट्रक जप्त केले. त्यानंतर पुढील कार्यवाही करून दंड वसूल केला.जिल्ह्यात अहेरी उपविभागात नदी नाल्यांची संख्या अधिक असल्याने या भागात रेती घाटही मोठ्या प्रमाणात आहेत. परिणामी याच भागात रात्रीच्या सुमारास रेतीची तस्करी होत असते. सिरोंचा तालुक्यातील अनेक रेती घाटातून काही दिवसांपूर्वी लगतच्या तेलंगणा राज्यात रेतीची नियमबाह्यपणे वाहतूक होत होती. त्यानंतर महसूल अधिकारी व कर्मचाºयांनी अनेक रेती घाट परिसरात सापळे रचून अनेक कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर या भागात रेती तस्करीचे प्रमाण कमी झाले आहे.
गौणखनिज तस्करांकडून ५० लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:06 AM
रेती, माती, मुरूम व इतर गौण खनिज तस्करीप्रकरणी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाडसत्र राबवून गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत एकूण ९२ प्रकरणे उघडकीस आणली. या कारवायांमध्ये ५० लाख ८५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ठळक मुद्देसात महिन्यातील कारवाई : ९२ प्रकरणे निकाली