शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चालू आर्थिक वर्षासाठी 508.12 कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 5:00 AM

जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत एकूण मंजूर नियतव्यय ४५४.२२ कोटी रुपये होता. तो सर्व निधी प्राप्त होऊन यंत्रणांनी तो १०० टक्के खर्चही केला. या बैठकीला आमदार व इतर सदस्य ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी असलेले खासदार, आमदार यांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याने ते अनुपस्थित होते.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी राज्यस्तरावरून एकूण मंजूर नियतव्यय ५०८.१२ कोटी रुपये आहे. त्यापैकी सर्व निधीची अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी ४५.७१ कोटींचा निधी प्राप्तही झाला आहे. याबाबतची माहिती मंगळवारी (दि.१७) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी मागील वर्षाच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. तसेच सन २०२१-२२ मधील जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेल्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत एकूण मंजूर नियतव्यय ४५४.२२ कोटी रुपये होता. तो सर्व निधी प्राप्त होऊन यंत्रणांनी तो १०० टक्के खर्चही केला. या बैठकीला आमदार व इतर सदस्य ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी असलेले खासदार, आमदार यांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याने ते अनुपस्थित होते.या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच सदस्यांनी वेगेवगळ्या समस्यांही मांडल्या. यामध्ये नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने तातडीने पावले उचलण्याच्या सूचना पालकमंत्री शिंदे यांनीं दिल्या. जिल्ह्यातील वीज समस्येबाबतही चर्चा झाली. नक्षलग्रस्त दुर्गम भागात वीज भारनियमन होता कामा नये, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर वीज मंत्र्यांसोबत बैठक घेऊन अडचण सोडवू, असे आश्वासन ना. शिंदे यांनी दिले.बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सादरीकरण करून गतवर्षी झालेल्या खर्चाबाबतची माहिती सादर केली. प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी केले. चालू आर्थिक वर्षातील ही पहिलीच बैठक असल्यामुळे किती निधी मिळताे, याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते.

जि.प.ने नियोजित केलेल्या कामांना मंजुरी-    विशेष म्हणजे जवळपास ८ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून चर्चेत असलेला जिल्हा परिषदेने नियोजित केलेल्या कामांचा मुद्दा या बैठकीत निकाली निघाला. जिल्हा निधीतून मिळणाऱ्या फंडासाठी जि.प.ने सर्वसाधारण सभेत मंजुरी दिलेल्या नियोजित कामांमध्ये बदल करण्याच्या मुद्द्यावरून बऱ्याच दिवसांपासून निधी थांबविण्यात आला होता. -    मंगळवारच्या सभेत हा मुद्दा निकाली निघाला. जि.प.ने पूर्वी सादर केलेल्या कामांच्या यादीला मंजुरी देण्यात आल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी सांगितले. याबद्दल माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

कमलापूरच्या हत्तींबाबत पालकमंत्री मुख्यमंत्र्यांशी बोलणारकमलापूर हत्ती स्थलांतराबाबत विविध सदस्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी चर्चा केली. हत्तींना बाहेर हलविण्यास मंजुरी देऊ नये अशी मागणी केली. याबाबत वन विभाग व  जिल्हाधिकारी यांनी एकत्रित बसून सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्या भावनांचा व जिल्ह्यातील पर्यटनाचा विचार करून तसा अहवाल तयार  करावा, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. या मुद्यावर आपण तातडीने मुख्यमंत्र्यांशी बोलू, असेही त्यांनी सांगितले.

सहा नवीन तिर्थस्थळे व पर्यटनस्थळांचा 'क' वर्गात समावेश

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांच्या ‘क’ वर्ग यादीत देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यातील सहा ठिकाणांचा समावेश करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. -    यात शिव मंदिर देवस्थान जुनी आरततोंडी, पळसगाव, शिव मंदिर देवस्थान डोंगरी आरमोरी, दुर्गा मंदिर देवस्थान रामसागर आरमोरी, दत्त मंदिर देवस्थान बोडधा, तालुका देसाईगंज, शिव मंदिर देवस्थान पोटगाव ता.देसाईगंज आणि शिव मंदिर देवस्थान डोंगरमेंढा, तालुका देसाईगंज यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcollectorजिल्हाधिकारी