दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत पाच वनविभागामध्ये तेंदू हंगाम सुरू झाला आहे. नॉनपेसा क्षेत्रातील २५ तेंदू युनिटमध्ये वनविभागामार्फत तेंदू संकलन व व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. याशिवाय पेसा क्षेत्रात पर्याय १ निवडलेल्या ग्रामसभांच्या १७ युनिटमध्ये वनविभागाच्या मार्गदर्शनात तेंदू हंगाम सुरू आहे. पेसा व नॉन पेसा या दोन्ही क्षेत्रातील मिळून ४२ तेंदू युनिटमध्ये आतापर्यंत ५४ हजार २१५ इतकी प्रमाणित गोणी तेंदू संकलन झाले आहे.गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत वडसा, गडचिरोली, भामरागड, आलापल्ली, सिरोंचा हे पाच वनविभाग असून सर्व वनविभाग मिळून एकूण १६० तेंदू युनिट आहेत. १६० पैकी १३५ तेंदू युनिट पेसा क्षेत्रात तर २५ तेंदू युनिट नॉन पेसा क्षेत्रात आहेत. पेसा क्षेत्रातील १९ तेंदू युनिट येत असलेल्या संबंधित ग्रामसभांनी यावर्षी पर्याय १ ची निवड केली आहे. या १९ तेंदू युनिटसाठी वनविभागाच्या मार्गदर्शनात लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये १९ पैकी १७ तेंदू युनिटची विक्री झाली. पेसा क्षेत्रातील व पर्याय १ मधील ४२ तेंदू युनिटमध्ये वनविभागाच्या मार्गदर्शनात तेंदू संकलनाचे काम सुरू आहे. उर्वरित ११८ तेंदू युनिटमध्ये ग्रामसभांच्या पुढाकाराने तेंदू संकलन व व्यवस्थापनाचे काम होत आहे. या तेंदू युनिट क्षेत्रामध्ये ग्रामसभा स्वत: तेंदू संकलन विक्री व व्यवस्थापन या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.नॉन पेसा क्षेत्रात वनविभागामार्फत २५ तेंदू युनिटमध्ये आतापर्यंत एकूण ४० हजार ३ इतके प्रमाणित गोणी तेंदू संकलन झाले असून या तेंदू संकलनाची टक्केवारी ९७.५७ आहे. या तेंदू युनिटमध्ये १ मे पासून तेंदू संकलनाचे काम झाले असून २६ मे पर्यंत हे काम चालले. नॉन पेसा क्षेत्रात वनविभागाच्या मार्गदर्शनात तेंदू संकलन होत असलेल्या युनिटमध्ये गडचिरोली वनविभागातील कुनघाडा, अमिर्झा, गडचिरोली, वडसा वनविभागातील पोर्ला, वैरागड, जोगीसाखरा, वडसा, नवरगाव या तेंदू युनिटचा समावेश आहे. आलापल्ली वनविभागातील १७ तेंदू युनिट नॉन पेसा क्षेत्रात मोडतात. यामध्ये देवदा, नरेंद्रपूर, पोटेपल्ली, घोट, ठाकूरनगर, अनंतपूर, आमगाव, चामोर्शी, रवींद्रपूर, कोनसरी, गुंडापल्ली, अडपल्ली, कोपअरल्ली, लगाम, मोहली, मुलचेरा व मथुरानगर आदी तेंदू युनिटचा समावेश आहे.पेसा क्षेत्रातील ग्रामसभांनी पर्याय १ ची निवड करून तेंदू संकलनाचे काम वनविभागाच्या मार्गदर्शनात केले. या १९ तेंदू घटकांमध्ये गडचिरोली वनविभागातील दोन, वडसा वनविभागातील १०, आलापल्ली वनविभागातील तीन, भामरागड वनविभागातील एक व सिरोंचा वनविभागातील तीन तेंदू घटकाचा समावेश आहे. या तेंदू घटकांमध्ये १ मे पासून २६ मे पर्यंत तेंदू संकलनाचे काम करण्यात आले.वनविभागाला ७ कोटींवर महसूल प्राप्तनॉन पेसा क्षेत्रातील २५ तेंदू युनिटची लिलाव प्रक्रिया वनविभागामार्फत राबविण्यात आली. या तेंदू युनिटमध्ये कंत्राटदारांच्या सहकार्याने तेंदू संकलनाचे काम पूर्ण झाले आहे. २५ तेंदू युनिट लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून वनविभागाला ४ कोटी ३१ लाख ७३ हजार ७२० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. पेसा क्षेत्रातील १७ युनिटमधून २ कोटी ७२ लाख ६१३ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. सर्वच ४२ तेंदू युनिटच्या माध्यमातून वनविभागाने एकूण ७ कोटी ३ लाख ७४ हजार रुपयांचा महसूल यंदा प्राप्त झाला आहे. तेंदू संकलनाबाबत गावांना वनविभागाचे मार्गदर्शन मिळते.
५४ हजारांवर प्रमाणित गोणी तेंदू संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:11 AM
गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत पाच वनविभागामध्ये तेंदू हंगाम सुरू झाला आहे. नॉनपेसा क्षेत्रातील २५ तेंदू युनिटमध्ये वनविभागामार्फत तेंदू संकलन व व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. याशिवाय पेसा क्षेत्रात पर्याय १ निवडलेल्या ग्रामसभांच्या १७ युनिटमध्ये वनविभागाच्या मार्गदर्शनात तेंदू हंगाम सुरू आहे.
ठळक मुद्दे४२ तेंदू युनिट : वनविभागाकडे नॉन पेसा क्षेत्रातील २५ तेंदू युनिटचे व्यवस्थापन