लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची तालुक्यातील कुमकोट जंगल परिसरातून १२ जानेवारी रोजी पुन्हा ५५ लाख २९ हजार ५०० रूपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई कोरची पोलिसांनी केली आहे. एकाच आठवड्यात कोट्यवधी रूपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. यावरून कुमकोट हे दारू तस्करीचे मुख्य केंद्र बनले असल्याचे दिसून येत आहे.पाच दिवसांपूर्वी पोलीस अधिक्षकांच्या पथकाने कोरचीपासून चार किमी अंतरावर असलेल्या कुमकोट येथील सुखदेव कल्लो याच्या घरी धाड टाकून सुमारे ५९ लाख ४० हजार रूपयांची दारू पकडली होती. या दारूतील बहुतांश दारू हरियाना व छत्तीसगड राज्यातील होती. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू साठा सापडल्याने सदर गाव चर्चेत आले होते. त्यानंतर पुन्हा कुमकोट गावाजवळील जंगल परिसरात दोन वाहनात दारू भरून असल्याची गोपनीय माहिती कोरची पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक तवाडे यांनी पोलीस पथकासह धाड टाकून दोन वाहनातील ५५ लाख २९ हजार रूपयांची दारू जप्त केली. एकाच आठवड्यात एकाच गावातून कोट्यवधी रूपयांची दारू जप्त करण्यात आली असल्याने एकच खळबळ माजली आहे. दोन्ही वेळा पकडलेली दारू निर्मल धमगाये या दारू तस्काराचीच असल्याची माहिती पीएसआय तवाडे यांनी दिली आहे.कोरची तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहेत. यापुर्वी चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारू आणली जात होती. आता मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंद झाल्याने दारू तस्कारांनी आपले लक्ष छत्तीसगड राज्यातील दारूकडे वळविले . छत्तीसगड राज्यातील दारू आणून ती चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात पोहोचविली जात होती. मात्र पोलीस प्रशासन आजपर्यंत गप्प बसले होते. या प्रकरणातील मुख्य दारू विक्रेता निर्मल धमगाये मात्र अजूनही फरार आहे. त्याला बेड्या टाकण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.कोरची तालुक्यात इतरही अवैध धंदे प्रचंड प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येत आहे.
कुमकोट येथे पुन्हा ५५ लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:14 PM
कोरची तालुक्यातील कुमकोट जंगल परिसरातून १२ जानेवारी रोजी पुन्हा ५५ लाख २९ हजार ५०० रूपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई कोरची पोलिसांनी केली आहे. एकाच आठवड्यात कोट्यवधी रूपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.
ठळक मुद्देकोरची पोलिसांची कारवाई : मुख्य दारू तस्कर अजूनही फरारच