शहरातील गणेश मंदिर हे शहरवासीयांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत मंदिर परिसरात विविध कार्यक्रम घेतले जातात. विशेष म्हणजे, श्री गणेश मूर्तीची स्थापना १९६५ मध्ये येंडे परिवाराकडून करण्यात आली. याच वर्षी नथुजी येंडे यांना स्वप्नात श्रीगणेश येऊन तहसीलदार निवासस्थानाच्या बाजूला माेकळ्या जागेत आपली मूर्ती असल्याचे सांगितले. निश्चित ठिकाणी खाेदकाम केल्यानंतर तेथे गणेशाची मूर्ती आढळली. ज्या ठिकाणी मूर्ती आढळून आली. त्याच ठिकाणी विधिवत मूर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या मंदिराचे वेगळे वैशिष्ट्य आहे, अशी भाविकांची मान्यता आहे. विशेष म्हणजे, येथे वर्षभर भाविक दर्शनासाठी येतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांची येथे गर्दी उसळते. सध्या मंदिराची देखभाल येंडे परिवारातील सदस्य तुषार येंडे हे करीत आहेत. सध्या माेठ्या उत्साहात गणेशाेत्सव साजरा केला जात आहे.
सिराेंचातील गणेशाेत्सवाची ५५ वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:35 AM