नगरपंचायतीच्या १४२ जागांसाठी ९ ठिकाणी ५५४ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 02:29 PM2021-12-14T14:29:22+5:302021-12-14T14:30:28+5:30
जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबर राेजी मतदान हाेणार आहे. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे हाेते. १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता एकूण ५५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
गडचिराेली : जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबर राेजी मतदान हाेणार आहे. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे हाेते. १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता एकूण ५५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
नगर पंचायतींच्या निर्मितीनंतरची ही दुसरी निवडणूक आहे. प्रत्येक नगर पंचायतीत १७ प्रभाग आहेत. मात्र नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागांचे आरक्षण न्यायालयाने रद्द करण्यात आल्याने या जागा वगळून निवडणूक घेतली जात आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १३ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली हाेती. एटापल्ली नगर पंचायतीत ८४ अर्ज प्राप्त झाले हाेते. त्यापैकी दाेघांनी माघार घेतली आहे. आता १७ जागांकरिता ८२ उमेदवार रिंगणात आहेत. चामाेर्शीनगर पंचायतमधील १३ प्रभागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. सहा जणांनी माघार घेतल्याने आता ४५ उमेदवार रिंगणात आहेत. कुरखेडा नगर पंचायतमध्ये १५ प्रभागांसाठी ६१ नामांकन दाखल झाले हाेते. एकानेही माघार घेतली नाही. त्यामुळे ६१ उमेदवार कायम आहेत.
धानाेरा नगर पंचायतीत १६ प्रभागांमध्ये निवडणूक हाेत आहे. एकाने माघार घेतलेल्या आता ५२ उमेदवार शिल्लक आहेत. सिराेंचा नगर पंचायतमधील १४ प्रभागांकरिता ६३ उमेदवार रिंगणात आहेत. काेरची नगर पंचायतमधील प्रभाग क्रमांक ५ साठी अर्ज केलेल्या दाेघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता ६८ उमेदवार निवडणूक लढत आहेत.
एटापल्लीतील एक जागा अविराेध
एटापल्ली नगर पंचायतमधील प्रभाग क्रमांक १७ मधील वासामुंडी गावातील जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव हाेती. खुल्या प्रवर्गाची जागा असल्याने अनेक उमेदवार रिंगणात उतरू शकले असते. परंतु गावकऱ्यांनी बैठक घेऊन गावातीलच जानू भीमराव गावडे हिला एकटीलाच अर्ज भरायला लावले. दुसऱ्या उमेदवाराने अर्ज भरल्यास त्याला सूचक काेणीही राहायचा नाही, असा निर्णय घेतला. सविता मासू तिम्मा यांनी नामांकन भरला हाेता. परंतु त्यांनी नामांकन मागे घेतल्याने या प्रभागातून जानू गावडे यांची अविराेध निवड झाली आहे.
नामांकन मागे घेतलेले उमेदवार
नगर पंचायत - वैध अर्ज - मागे - शिल्लक
एटापल्ली - ८४ - २ - ८२
चामाेर्शी - ५१ - ६ - ४५
कुरखेडा - ६१ - ० - ६१
धानाेरा - ५३ - १ - ५२
सिराेंचा - ६४ - १ - ६३
काेरची - ७० - २ - ६८
मुलचेरा - ५१ - २ - ४९
भामरागड - ६२ - ० - ६२
अहेरी - ७७ - ५ - ७२