लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा आला की अनेक गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. जिल्ह्यातील भामरागडसह इतर काही तालुक्यांमध्ये पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण जास्त आहे. यात गेल्या ५ वर्षात ५६ जणांना आपले प्राण गमवावे लागले.नदी, नाल्यांना येणारा पूर, अतिवृष्टी, झाडे व घर कोसळणे यासह वीज पडणे यासारख्या नैसर्गिक संकटांना दरवर्षीच नागरिकांना तोंड द्यावे लागते. सुविधांच्या अभावामुळे पुराच्या वेढ्यात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे एक आव्हानच असते. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला आहे. वैनगंगा, खोब्रागडी, कठानी, इंद्रावती, र्पकोटा, सती या नद्यांसह अनेक उपनद्या या जिल्ह्यातून वाहतात. पावसाळ्यात या नद्यांना येणारे पूर नदीकाठावरच्या नागरिकांसाठीच नाही तर नदी ओलांडून जावे लागणाऱ्या अनेक गावांसाठीही मोठे अडचणीचे ठरतात. आपत्ती निवारण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात पुरात वाहून गेल्याने १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात वर्ष २०१३ मध्ये ७, २०१४ मध्ये ३ आणि २०१६ मध्ये ५ लोकांचा बळी गेला आहे. मात्र २०१५ आणि २०१७ मध्ये पुरात कोणालाही प्राण गमवावे लागले नाही. अतिवृष्टीमुळे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घर आणि झाड पडल्याने २०१३ मध्ये २ आणि २०१४ मध्ये एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले. यानंतर घरे आणि झाडे पडण्याच्या अनेक घटना झाल्या, पण यात जीवितहानी झाली नाही. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक वीज पडून मरण पावणाºयांची संख्या ३७ आहे. तर ५४ जण जखमी झाले आहेत. यासोबतच काही प्राण्यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.
पाच वर्षात ५६ जणांनी गमावले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:21 AM
पावसाळा आला की अनेक गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. जिल्ह्यातील भामरागडसह इतर काही तालुक्यांमध्ये पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण जास्त आहे. यात गेल्या ५ वर्षात ५६ जणांना आपले प्राण गमवावे लागले.
ठळक मुद्देनैसर्गिक आपत्ती : वीज पडून सर्वाधिक ३७ जणांचा मृत्यू, ५४ नागरिक जखमी