लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनुत्तीर्ण झालेले दहावीचे ३ हजार ५०६ व बारावीचे २ हजार २२३ असे एकूण ५ हजार ७२९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीची परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट व दहावीची परीक्षा १७ ते २९ जुलैदरम्यान आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दक्षता समिती सभेत निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी आढावा घेतला. परीक्षाकाळात गैरप्रकार घडे नये, यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना सूचना केल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम कॉपीमुक्त अभियान सुरू केले आहे. या कॉपीमुक्त अभियानाची १०० टक्के अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या. दक्षता समितीमधील पोलीस विभागाच्या प्रतिनिधींना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.पी.निकम यांनी परीक्षेबाबत माहिती व कॉपीमुक्त अभियानातील भरारी पथकाबाबत माहिती दिली.या ठिकाणी होणार परीक्षादहावीची परीक्षा शिवाजी हायस्कूल गोकुलनगर गडचिरोली, धर्मराव कृषी विद्यालय अहेरी, कुथे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल देसाईगंज, जिल्हा परिषद हायस्कूल सिरोंचा, जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा, महात्मा गांधी विद्यालय आरमोरी, भगवंतराव हायस्कूल अहेरी, जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्ली, राजे धर्मराव हायस्कूल मुलचेरा, शिवाजी हायस्कूल चामोर्शी, कृषक हायस्कूल चामोर्शी, श्रीराम विद्यालय कुरखेडा येथे होणार आहे.बारावीची परीक्षा जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली, राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय अहेरी, हितकारणी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय सिरोंचा येथे होणार आहे.दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी बुधवारपासून आयोजित केलेली परीक्षा ही उत्तम संधी आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, यासाठी प्रयत्न करावे.- शेखर सिंह, जिल्हाधिकारी, गडचिरोली
५,७२९ विद्यार्थी देणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:01 PM
अनुत्तीर्ण झालेले दहावीचे ३ हजार ५०६ व बारावीचे २ हजार २२३ असे एकूण ५ हजार ७२९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीची परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट व दहावीची परीक्षा १७ ते २९ जुलैदरम्यान आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा : दहावी, बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात