शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

५,८४९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:08 AM

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ८० केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. ५ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

ठळक मुद्देजिल्हाभर ८० केंदे्र : पाचवी व आठवीचे विद्यार्थी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ८० केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. ५ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले.जिल्हाभरातून शिष्यवृत्ती परीक्षेकरिता इयत्ता पाचवीच्या ३ हजार २५७ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता. यापैकी ३ हजार १२८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले. याची टक्केवारी ९६.०३ एवढी आहे. इयत्ता आठवीच्या २ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज सादर केला होता. परंतु २ हजार ७२१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. याची टक्केवारी ९४.९४ एवढी आहे. गडचिरोली शहरात स्कूल आॅफ स्कॉलर्स, कारमेल स्कूल, वसंत विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, राणी दुर्गावती विद्यालय, शिवाजी हायस्कूल आदी शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आले. जिल्हाभरात विविध ठिकाणी तालुकास्तरावर परीक्षा घेण्यात आली.आरमोरी - येथील महात्मा गांधी विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तसेच तालुक्यात महात्मा फुले विद्यालय देऊळगाव, किसान विद्यालय वडधा, विवेकानंद विद्यालय मानापूर, हितकारणी विद्यालय आरमोरी, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी, शिवानी विद्यालय वडधा, महाराष्ट्र विद्यालय वैरागड अशा एकूण दहा केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे ३२२ पैकी ३१७ व इयत्ता आठवीचे ३१९ पैकी ३१३ असे एकूण ६३० विद्यार्थी सहभागी झाले. गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांच्या नियंत्रणात परीक्षा गटसमन्वयक शिक्षण विस्तार अधिकारी गुलाबसिंग राठोड यांनी काम पाहिले.अहेरी - धर्मराव कृषी विद्यालय व भगवंतराव हायस्कूल या दोन केंद्रावर घेण्यात आली. धर्मराव कृषी विद्यालयातील केंद्रावर इयत्ता पाचवीचे एकूण २०८ पैैकी १८८ व इयत्ता आठवीचे ११६ पैैकी ११२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. भगवंतराव हायस्कूलच्या केंद्रावर इयत्ता पाचवीचे एकूण १०४ पैैकी १०१ तर इयत्ता आठवीचे ११६ पैकी १०९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. दोन्ही केंद्रावर एकूण ४०६ विद्यार्थी सहभागी झाले. तर ३० विद्यार्थी अनुपस्थित होते. बीईओ निर्मला वैद्य यांच्या मार्गदर्शनात केंद्र संचालक म्हणून सुषमा खराबे, गर्गम, राजू नागरे, आत्राम यांनी काम पाहिले.